Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

तेव्हां ह्मणाले कीं, नवाब बोलिले जे, मीं निघावें, नाहीं तर तुह्मीं निघून फौजेची गिर्दावरी करावी, तेव्हां मला जाणें प्राप्त. ऐशी आज्ञा असल्यास तुह्मींच जावें, प्राप्त आहे, ह्मणोन सलाह सांगितली. नंतर हळूच पुसूं लागले कीं, अलीज्याह गेले. यांत श्रीमंतांचे संमत आहे कीं काय ? मीं त्यास सांगितलें जे, तुह्मांस सांगितलें तर खरें वाटणार नाहीं. मला प्रमाण वाटेल, सांगावें, ह्मणोन बोलिले. तेव्हां वास्तव्य सांगितलें. अलीज्याहानीं हें कर्म केलें यांत श्रीमंतांचें संमत खरेंखुरें नाहीं, हें वर्तमान श्रीमंतांस कळलियावर अलीज्याहाचे बुद्धीस दोष ठेवतील, चांगलें ह्मणणार नाहींत. तेव्हां ह्मणाले, याविशीं शपत करावी. तेव्हां शफतपूर्वक त्यास खातरजमा वाटे अशाप्रकारें सांगितलें कीं, या सलाहांत श्रीमंत शफतपूर्वक नाहींत, वास्तविकच गोष्ट, मग शफत करावयासी काय चिंता. ह्मणोन शफत करून त्यास सांगितलें. पुढें बोलिले कीं, याचे बंदोबस्ताविशीं श्रीमंतांस आपण कांहीं लिहितील कीं काय ? मी बोलिलों, नवाबांनीं पत्र लिहावें, आज्ञा करतील त्याप्रमाणें मीही लिहीन, मदारुलमहाम दुरंदेश आहेत, नवाबाची पास त्यांस सर्वोपरी आहे. तेव्हां ह्मणालें, आपण शपथपूर्वक बोलिला, याप्रमाणें मी नवाबास खातरजमा करून सांगूं किंवा नको ? त्यास ह्मटलें कीं, श्रीमंतांचे दौलतीस व नवाबाचे रोनक आणि बेहबूद दिवसेंदिवस अधिक सफाई व्हावी या इराद्यावर आह्मीं मजबूत, तेव्हां हजरतीशीं खातरजमेनें बोलावयास काय चिंता ? बोलावें. नंतर बोलिले कीं, आजपर्यंत मजकडून अंतर पडलें असेल, त्याची क्षमा करावी, मी सर्व प्रकारें आपला आहे. नवाबाचे दौलतखाहीविषयीं खातरजमा केली. मीही श्रीमंतांचे दौलतखाहीविषयीं आपली खातरजमा करितों ह्मणोन शफत केली. उत्तम ह्मणोन बोलिल्यावर ह्मणाले, हा मजकूर नवाबाशीं बोलून उदईक आपल्यास चोबदार बोलावूं पाठवितों, अथवा मला आज्ञा झालियास मी येईन. उत्तम ह्मणोन सांगोन वाटे लावले. तेच वेळेस ते नवाबाकडे जाऊन बोलिले. मीरअलम व मुनसी आमजदुलमुलूक नवाबाजवळ होते. नवाबाशीं मुनसीनीं बोलून आमजद्दुलमुलूक यांनीं व मीरअलम यांनीं आपले घरास यावें ह्मणजे रावजी येतात. ऐशी परवानगी उभयतांस घेतली. इतकियांत राजाजी जाऊन नवाबाशीं उभें असतां कानांत बोलले. ते वेळेस मीरअलम मुनसीजीस ह्मणाले, आतां दुस-यानें परवानंगी द्यावी तर आह्मीं येंऊं. तेव्हां मुनसीनीं मागती नवाबास विचारिलें. आज्ञा झाली जे, रावजीस उदईक येथेंच बोलावूं, तेव्हां समक्षच बोलणें होईल, रावजीस तुह्मीं आपले येथें बोलावूं नये. याप्रमाणें झालें. दुसरे दिवशीं प्रातःकाळींच नवाबाचा चोबदार आला. नंतर गेलों. तो मजकूर अलाहिदा लिहिला असे. र।। छ ६ मोहरम. हे विज्ञापना.