Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२३०] श्री. २३ आक्टोबर १७९५.
विनंति विज्ञापना. अजमुलउमरा यांचे निसबतीस पागा होती. त्या पागेची धोंडियांस दाणाचारा वगैरेचा बोभाट पडूं लागला. पागेची यहतीयात नाहीं. सबब पागेची मोजदाद गल्ला व चारा वगैरे पहाण्याचें काम इमतीयातुदौला, कयामन्मुलुक यांस नबाबांनी सांगितलें. सुरज वंत वगैरे दफ्तरदार यास चंदी, खुराकी व बारगिरांचे दरमाह वगैरे हिसेब इमतीयाजुदौला यांस समजावणें ऐशी आज्ञा झाली. त्याप्रों। कयामन्मुलुक पागेची चौकशी करावयास लागले आहेत. र।। छ ९ माहे र।।खर. हे विज्ञापना.
छ १२ माहे र।।खर मु।। भागानगर, रवाना टप्यावरून.