Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२३४] श्री. २६ आक्टोबर १७९५.
विनंति विज्ञापना. अलीज्याह धारूरचा घाट उतरून गेले. इकडील जमीयत स्वार पयेदळ इंग्रजी पलटणेंसुद्धां रेणापूरचे मैदानांत आहेत. पुढें पिच्छा करून जावें तर राव पंतप्रधान यांचा तालुका तसनस होईल, यास्तव आहेत त्या जागीं तूर्त वाकफड जाला. राव पंतप्रधान यांजकडील सरदार व तालुकदारांनीं आडवें होऊन माहसरा करावा हें मरातब तुह्मांस लिहावयास सांगितलें, करितां पत्र दिल्हें तें रवाना केलेंच असेल. दोहीं दौलतींची दोस्ती व एकवाक्यता. तेव्हां प्रसंगास जिकडील उणीव तिकडील पुरवणी करावी हा तर्फौनचा शिलशिला चालत आला. सांप्रत प्रसंगीं हा मझेला दूर व्हावा हें सलाह तिकडे आहे. मदारुल्महम त्या सरकारचे दौलतखाह. तसेंच इकडील दौलतखाही त्याजकडेच आहे. हल्लीं मदारुल्महाम यांस पत्र देतों, त्यांत तुमचे लिहिण्यावर हवाला घालून लिहिण्यांत येत आहे. तुह्मीं सर्व प्रकार तपशिलें लिहून जबाबास जवाब जलद येत ऐसें करावें ह्मणून नबाबाचें सांगण्यांत आलें. राजश्री नाना यांचें नांवें पत्र तयार करवून दिलें, व सांगितल्या अन्वयें तपशील त्यांचे पत्रीं लिहिला आहे, त्यावरून ध्यानांत येईल. र।। छ १२ र।।खर. हे विज्ञापना.