Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[५०]                                                                               श्री.                                                                             ८ जुलै १७९५.

विज्ञापना ऐसीजे. श्रीमंतांकडील सूत्र अलीज्याहाकडे असेल ऐसा. गुमान येथें आहे. आपले सरकारांतून तर कांहींच नाहीं. ह्मणून स्वामीनीं केवळ तटस्थ राहूं नये. नवाबाची आणि सरकारची - दोस्ती दिली. नवाबाचा वृद्धापकाळ, या दिवसांत तमाषबीनी स्वामीकडून झालियास दौलतीस नवाबाचे धक्का बसेल. कदाचित् लढाईचा प्रसंग पडल्यास परिणाम ईश्वराधीन. जर त्याची शिकस्त झाली, आणि बरें वाईट झालियास मुलाची समजूत करावयाची होती, ती न केली, आपले हातानें घात केला, असें होईल. यांतही बदनक्षी नवाबाची, कदाचित् शिकस्त वडिलावर कांहीं गुजरली तर मुलाकडे बदनामी आणि येथपर्यंत वडिलांनीं कां लांबणीवर टाकून ह्मातारपणीं बदनामी घेतली असें होतें. दोहींकडूनही चांगलें नाहीं. येथें नवाबास दूर देशींची गोष्ट कोणी सांगेल असें दिसत नाहीं. बहुतकरून सर्व नोजवान आहेत. कित्येक वयस्क आहेत, त्यांनीं बोलावें तर खावंदाचे समजेचा भरंवसा येत नाही. अशी गोष्ट कां सांगतात, हा संशय मनांत येऊन काय गाठ मनांत बसेल न कळे. यासाठीं कांही बोलत नाहींत. प्रस्तुतकाळीं नवाबास कोणाचा विश्वासही येत नाहीं. यास्तव सर्व अंदेशा आहेत. कोणी पुढारी होऊन बोलूं सकत नाहींत. या प्रसंगीं स्वामीनीं स्वस्थ बसूं नये. दूर देशीचे भणि यगानगतेचे मार्गे नेक सलाह मसलहत घराऊ असेल ती नवाबास लिहावी. अलीज्याहा याजकडेही सांगून पाठवून त्याचे मनांतील अर्थ समजून घेऊन त्यास निषेध करावयाचा असेल त्याविषयीं निषेध करून सांगून मार्गावर आणावें. त्याची कांहीं आड असेल त्याजविषयीं नवाबांस तशी रदबदल करावी. नवाबाकडून ऐकवून समजूत परमारें करून द्यावी. अलीज्याहा जर न ऐकतील तर त्यास दाबून आपणही सांगावें लागेल. यास्तव कांहीं फौज घेऊन स्वामीनीं निघावें. नवाबास लिहावें कीं अलीज्याहा यानीं मार्गाच्या गोष्टी ऐकिलियास उत्तम, नाहीं तर त्यास शिक्षा करून ऐकवूं, दाबानें सांगितल्यावेगळ ऐकणार नाहींत, याजकरितां आह्मी निघालों. नवाबाचे मनांत संशय न यावा, याविषयीं खातर जमा करावी, आणि उभयतांचा हित बसवावा ही गोष्ट सर्वा परी चांगलीं. सरकारचा पाय मध्यें घालावाच घालावा. दोस्ती एकदिली राखन करावयास बाधं नाही. नवाबाची आणि सरकारची दोन्हीं दौलती एक. याचा लौकिक या गोष्टींत आहे. जे उभयतां एकदिल होऊन घरची आग विझविली, तिस-यास खबर देखील नाही. या पुरवणीत चढउताराचे प्रकार थोडक्यांत लिहिले आहेत एक एक कदम ठेवीत करावे. मिठी सोडूं नये. यांत फार गुण चहूंकडे आहेत. ही पुरवणी तीन वेळ वाचून पाहून मनन व्हावें याचा विस्तार वाटावाट केल्यानें फार समजण्यांत येत जाईल. याजवर जितका उपन्यास करावयाची मर्जी असेल तितका करून पहावा. गुणच येतील. मनन जरूर व्हावें, नवाबाची स्वामीची दोस्ती घरोबा. याजकरितां सूत्रप्राय लिहिलें आहे. याचें उत्तर मला यावें ह्मणजे स्वस्थ होईन. र॥ छ २० जिल्हेज. हे विज्ञापना.