Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२२९] श्री. २३ आक्टोबर १७९५.
विनंति विज्ञापना. अलीज्याह बहाद्दर जमीयतसुद्धां धारूरचा घाट उतरून मौजे पिंपळनेर पो। बीड येथें गेले. तेथून कुच करून गंगातीरास, शाहूगडानजीक पोंहचल्याचें वर्तमान आलें. दुसरें वर्तमान कीं, सदाशिव रड्डी याजपासून अलाहिदा होऊन पिंपळनेरीं राहिला. याचें कारण सदाशिव रड्डी याचें सूत्र इसामिया याचे विद्यमानें नबाबांकडे परभारा लागलें. हें वर्तमान अलीज्याहा यांस समजल्यानंतर रड्डीमजकूर याचां संशय त्यांचे मनांत येऊन बेबनाव जाला. अलाहिदा राजकारण सदाशिव रड्डीकडून लागलें. तेंव्हा त्यास आपलेजवळ ठेवण्यांत त्याचा इतबार व भरंवसा कोणे गोष्टीचा, हे समजोन सदाशिव रड्डीस सांगितलें कीं तूं आमचे समागमें असण्याचें कारण नाहीं. याप्रों। होऊन सदाशिव रड्डी यास बराबर न घेतां कुच करून अलीज्याह जमीयत व सरदार गालबजंग, नाजमन्मुलुकवगैरे सुद्धां गंगातीरा पर्यंत गेले, ऐसें वर्तमान आहे. सदाशिव रड्डी अलाहिदा राहिल्याचें तहकिक किंवा वाही वर्तमान हें खचित समजल्यावर मागाहून विनंति लिहिण्यांत येईल. रड्डीमजकूर यांचें सूत्र इकडे, सबब याप्रों। जालें असेलसें वाटलें. खरें लटकें मागाहून पक्का शोध वर्तमान आल्यावर लिहिण्यांत येईल. रड्डीचें सूत्र इसामियाचे विद्यमानें खरें, त्यावरून वेगळा झाला असेल याचा संभव होतो. र॥ छ ९ माहे र।।खर. हे विज्ञापना.