Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२३२] श्री. २६ आक्टोबर १७९५.
विनंति विज्ञापना. छ ९ माहे. र।।खर शुक्रवार विजयादशमीचे दिवशीं रात्रीं नबाबाकडे दरबारास गेलों. रोषन महालाचे सहजामध्यें चांदणीचा फर्ष होऊन बरामद जाले. नफरुदौला व रावरंभा व मुनषी व राजाजी वगैरे दरबारी इसमें होतीं. दस-याच्या नजरा लोकांच्या होत होत्या. आह्मीं जातांच सलाम होऊन जवळ बसावयास सांगितलें. बोलणें झालें, त्याचा तपशील अलाहिदा पुरवणी पत्रीं विनंति लिहिली आहे त्यावरून ध्यानांत येईल. र॥ छ १२ माहे र।।खर. हे विज्ञापना.