Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२३३] श्री. २६ आक्टोबर १७९५.
विनंति विज्ञापना. दस-याचे दिवशीं नबाबाकडे दरबारास गेलों तेसमयीं प्रथम नबाबाचे बोलण्यांत आलें कीं, इंग्रजी पलटणें येथून रवाना केलीं तीं रेणापूरचे जिल्ह्यांत आहेत, त्यास पलटणांचें तेथें प्रयोजन नाहीं, यास्तव इकडे आणावीं ऐसा विचार आहे, ह्मणून बोलिले. मीं विचारिलें कीं इंग्रजी पलटणें कामावर तेथें असतां इकडे बोलावण्याचें काय कारण ? याजवर बोलिले कीं तिकडे आपला तालुका बहुत आहे, इंग्रजी लोकांस तालुका बहुत दृष्टीस पडणें हें सलाह नाहीं, यास्तव पुढें त्यांचें जाणें न होतां. त्यांस इकडे बोलवावे वरकर सरदार जमीयत आहेच असें बोलिले. त्यास मनास हें बोलणें ठसलें नाहीं. येथपर्यंत पलटणें आलीं तेव्हां मुलुक पहातच आले कीं नाहीं. पहिल्यानें हा विचार केला नाहीं. आतां या विचाराचें प्रयोजन काय? याजवर मनांत कल्पना आली जे, पुढें सरकारचा तालुका आहे, याजकरितां इंग्रजानें दिकत केली असेल कीं पंत प्रधान यांचे तालुकियांत आह्मीं जाणार नाहीं हीं गोष्ट आह्मांशीं बोलता येत नाहीं. यास्तव त्यास बाहाणा दुसरा लावून बोलले. तिकडील कार्यावर उपयोग नाहीं. तेव्हां तेथें असून फळ काय? याजकरितां इकडे बोलावून घ्यावीं हा विचार केला. आह्मांस कळविलें पाहिजे याजकरितां एक तकरीबीनें बोलले. प्रस्तुत इंग्रजी पलटणें आप्पविलीं नाहींत. तेथेंच मुक्कामात करून असावें, असें सांगून पाठविलें. सरकारचे तालुकियांत फौजा गेलियावर तसनस होईल यास्तव इतल्ला देण्याकरितां पेशजी पत्रें नवाबांनीं दिलीं तीं पाठविलीं आहेत व हल्लीं राजश्री नानास लिहावयासी नबाबांनीं सांगितलें त्याप्रमाणें लिहिलें आहे. श्रवण करवितील त्याज वरून ध्यानांत येईल. परवानगी जाहलीयावर फौजा सरकार तालुकियांत अलीज्याह यांचे पाठलागास पाठवितील. इंग्रजांनीं दिकत केलियास आह्मांस ह्मणतील कीं परवानगी श्रीमंतांची जाली आहे.असें तुह्मीं सांगावें. तेव्हां सांगावें लागेल. नंतर इंग्रजी पलटणें सरकार तालुकियांत जातील असें वाटतें. याचा विचार होऊन आज्ञा येईल त्याप्रमाणें नबाबाशीं बोलण्यांत येईल. र।। छ १२ माहे र।।खर हे विज्ञापना.