Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[४९]                                                                               श्री.                                                                             ८ जुलै १७९५.

विज्ञापना ऐसीजे. नवाबाच्या पत्रांचीं उत्तरें लवकर यावीं. यास फार दिवस लागूं नयेत. नवाबाचे आणि सर्वांचे मनांत अंदेशा आहे कीं, अलीज्याहा फक्त जमीदाराचे बोलण्यावर बहकणार नाहीं, कांहीं एक आश्रा कोणाचा असेल ह्मणून कित्येक लोक यास भरंवसा वाटून परमारें स्वार अलीज्याहाकडे नोकरीस जातात. नवाबासही अंदेशा मोठाच आहे. याजकरितां स्थळें सुधी करितात. आपले सरकारचा दोरा तर नाहीं. नवाबाजवळ जमेयत प्रस्तुत थोडी आहे. मुसारेमूयाची चार हजार गाडद सध्यां येथें आहे. बाकी कांहीं पूर्वीं बरतर्फ, कांहीं ज्याबज्या गेली. चहूं हजारांतून हजार गाडद येथें ठेवून तीन हजार गाडद देऊन त्यांस पाठविलें. पागावाले घासीमिया व महमद आजीमखान यास रुकसतीचें पानदान दिल्हें. तेही शहराबाहेर जाऊन उतरले. चारशें लोक उभयतां मिळून तूर्त आहे. बारगिरांस निरोप दिला, त्यांस बोलावणीं गेलीं आहेत. पागेचीं घोडीं तालुक्यांत आहेत तेथून आणविलीं आहेत. अलीज्यांहा यानीं परभारें न नेलियास येतील. रोषनखान याचे भाऊ सुमानखान याजवळ सहा घोडीं, दहा वीस माणसें, जोधसिग खंदारकर याजवळ दहा घोडीं, वीस पंचवीस माणसें, इसामिया याचे शें दोनशें लोक, याप्रमाणें बाहेर उतरले आहेत. प्रस्तुत तर इतकीच जमीयत आहे, असदअल्लीखान रुकसत होऊन आपले नवे तालुक्यांत गेले. तालुक्याचा बंदोबस्त करून फौज नवी व पायदळ ठेवून दोन महिन्यांनंतर मोहरम झालियावर येणार. याप्रमाणें आहे. र॥ छ २० जिल्हेज. हे विज्ञापना.