Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२२८] श्री. २३ आक्टोबर १७९५.
विज्ञापना ऐसीजे. राजश्री रघोत्तमराव बोलिले कीं अलीज्याह प्रकरणीं मीरअलम यांचें बोलणें जालें त्याप्रमाणें आपण सूचना लिहिलीच असेल. त्या संकेतावर त्यांनीं हल्लीं नबाबास अर्जी लिहिली आहे जेः-- अलीज्याह धारूरचा घाट उतरून गेले. त्याचे पाठीमागें जावें. आह्मीं परंतु पंतप्रधान यांचा तालुका पुढें लागते. त्यांची तसनस आमचे फौजेमुळें होईल. ते काय ह्मणतील न कळे, याजकरितां अंदेषा आहे. ह्मणोन हुजूरचे परवानगीचा उजूर केला. हुकूम येईल तसें करण्यांत येईल, त्या अर्जीचा जबाब मीरअलम यास जावयाचा ठरला आहे कीं आह्मीं पंत प्रधान यांस इतल्ला लिहून पाठवितों, तुह्मीं ताकुब करून जावें. या मनसुब्यावर हल्लीं श्रीमंतांस नबाबांनीं पत्रें लिहून दिलीं आहेत. त्यास दोस्तीचे आलमांत नबाबाचे दौलतीचा बंदोबस्त राहून अलीज्याह याचा बचाव होणें असें श्रीमंतांचे मनांत आहे. ह्मणून नबाबास पेशजी सरकारचें पत्र आलें. त्यापक्षीं मीरअलम यास पत्र जावें जे , तुह्मी फौजसुद्धां सरकार तालुकियांत आलियास पायमाली होईल, आह्मीं अलीज्याहप्रकरणीं नबाबास लिहिलें त्याचें उत्तर आलें नाहीं, उत्तर आलियावर त्याचा विचार. दौलतखाहीचे मार्गे आह्मीं ह्मणतों तशी तोड काढून कजीया मिटवावा, फंद तोडावा, यांत तालुकियाची खराबी आणि फौजेचा खिसारा बेमुबलग होतो, तो तरी कां करावा, थोडकियांत बंदोबस्त होत असतां तुल करून खिसारा वाढवावा हें सलाह नाहीं, असें त्यांस पत्र जावें, ह्मणजे तोडीखाले येईल. नबाबास श्रीमंताचे जाब हल्लींचे पत्राचे तरकिबीनें दोस्तीचे अलमांत घराऊ मसलहत दौलतस्वाहीनें लिहिलें ह्मणून यावें. ह्मणजे नबाब समजत समजत समजतील. श्रीमंतांशिवाय नबाबापाशीं अलीज्याहची रदबदल कोणी करावी अशी ताकद नाहीं. अलीज्याह यांचा बचाव करण्याची मर्जी असल्यास ही तोड आहे. सत्रावे र।।वलचे रवानगींत तपशील लिहिला त्याजवरून ध्यानांत आलेंच असेल. आज्ञा येईल त्या धोरणानें करावयासी येईल. र।। छ ९ र।।खर हे विज्ञापना.