Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२१२] श्री. १४ आक्टोबर १७९५.
विनंति विज्ञापना. अलीज्याहबहादूर जमीयतसुद्धां तालुके मरुग प।। उदगीर या जिल्ह्यांत सदाशिव रड्डी व नाजमन्मुलुक वगैरेसहित आहेत. मीरअलम इंग्रजी पलटणासमवेत बेदरास दाखल होऊन तेथून मुसारेमू व घाशीमिया वगैरे सरदार पुढें कूच करून मैलारस गेले. त्यांत षामील झाले. ताकुब करून आलीज्याह यांस गाठावें असा हुकूम. परंतु नदी वांजरेस पाणी बहुत, याजकरितां उतरून जाण्याची अडचण व पाऊसही तिकडे. यास्तव विचारांत आहे. त्यांजकडे बोलणें चालणेंही जारी आहे. त्यांजकडून कोणी गृहस्थ सरदारांकडे येऊन गेले. इसामिया नबाबाकडे येऊन येथून तिकडे मागती गेले. बोलण्याचा नाद लागला आहे. पुढें काय ठरतें हें वर्तमान येईल त्या प्रो। विनंति लिहीन. अलीज्याह याजकडील लोकांनीं उदगीर वगैरे तालुक्यांत कित्येक जागी ठाणी बसवून ताख्तताराजी मांडली. सजावारुद्दौलाशीं व त्याचे लोकाशीं कांहींशी लढाईही होऊन सजावारुद्दौलींनीं शें पन्नास घोंडी आणली होतीं तीं त्यांनीं कुटबाजी करुन घोडीं सोडवून नेलीं, असें वर्तमान आलें. पुढें होईल त्याची विनंति लिहिण्यांत येईल र।। छ ३० र।।वल. हे विज्ञापना.