Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१६०] श्री. १३ सप्टेंबर १७९५.
विनंति विज्ञापना. किस्तीचे ऐवजप्रकरणीं नवाबासी छ २२ रोजीं बोलण्यांत आलें. त्याचा सरासरी मजकूर लिहून मागाहून तपशिलें लिहितों ऐशी विनंति यापूर्वीं लिहिण्यांत आली. त्यास किस्तीचा मजकूर आज्ञेअन्ययें नवाबासी बोलण्यांत आल्यानंतर उत्तर झालें की, करारमदार ठरण्यांत आले, त्यांत आह्माकडून तफावत नाहीं, किस्त आदा करण्याची तजवीज हमराही जमीयत बरतर्फ करून मार्गांतच कितेकांस रुखसत केले. हैदराबादेस येण्याचे पूर्वींच इंग्रजी पलटणें दूर करून मार्गस्थ केलीं. सबब कीं, जमीयतीचा खर्च तुटला. आणि तालुक्यांतील तहशील जमा करून किस्तीचे ऐवजाची सरबराई करावी, या तरतुदींत; तो एकबएक घरांतील फिसाद उभा राहिला. येणेंकरून तालुक्यांची तमाम ताख्त व ताराजी होऊन कोठील पैसा या दिवसांत मवसर नाहीं आणि जमीयत जमा करणें लाजम पडले. याचा खर्च व खिसा रोजबरोज ज्यारीं. या बखेड्यामुळें जे तजवीज योजिली होती त्याचा प्रकार बिलफैल या त-हेवर गुजरला. राव पंतप्रधान यांसी घरोब्याचा प्रकार पोषिदा नाहीं. यास्तव तर्फैन मुलाकातीचा इत्यफाक ठरण्यांत यावा, ह्मणजे सर्व गोष्टींचा खुलासा परस्परें होऊन अमलांत यईल. याजवर आह्मीं उत्तर केलें कीं, दोन्ही दौलती एक, जुदाई रतीबराबर नाहीं, हे एकीन व बज्या, त्यापक्षीं मुलाकातही होण्यास काय पसोपेश आहे, याचाही निश्चय तर्फैनचे सलाहाप्रमाणें ठरेल; लेकिन किस्त आदा करणें वगैरे जाबसाल हे अमलांत येऊन, बाद हरदो सरकारचे मुलाकातीचा इत्यफाक व खुलाशाचीं बोलणीं घडावीं हें चांगलें. याजवर नवाब बोलिले कीं, किस्त आदा होणें याची शकल ज्यांत इकडून निभावणी होऊंसके आणि राव पंतप्रधान यांस ऐवज पोहचे अशी ठरण्यांत आली पाहिजे. आह्मीं उत्तर केलें कीं, किस्तीची शकल ठरावी ऐसे मोहगम हजरत ह्मणतात यांत काय समजावें, या त-हेनें शकल ठरली असतां अमलांत येते याप्रमाणें खुलाशानें सांगितल्यावांचून समजण्यांत कसें येईल? याजवर नवाब बोलिले कीं याची शकल ठरणें ते राव पंतप्रधान यांजकडेच आहे, तें ठरावितील तसें. हें बोलणें किस्तीप्रकरणीं झाल्यानंतर मी विचारलें कीं, वरकड मामलतसंबंधें वगैरे जाबसाल याजविषयीं कांहीं असेंच आहे किंवा याचे कडचे होऊन एक किस्तीचाच सवालजबाब ठरण्यावर. याचें उत्तर झालें कीं, वरकड जाबसाल तुह्मीं व मीरअलम, राजाजी ऐसे बसोन ठरवावे, किस्तीप्रकरणीं निभाव पडे अशी तजवीज ठरली पाहिजे. येविषयीं मोहगम तुह्मीं ल्याहावें ऐसें बोलिले आहेत. त्यास मीरअलम राजाजीसुद्धां जलसा होणार त्यांत कोणते जाबसाल कसे ठरतात व किस्तीचीही शकल काय त-हेनें ठरावून ल्याहावयास सांगतात हें सरकारचे थैलीपत्राचा जवाब रवाना करण्यास देतेसमयीं सांगतील त्याप्रमाणें तपशीलें विनंति लिहीन. परंतु एखादें दुसरें साल किस्तीस अधिक ठरावून करावें असाही भावं दिसत नाहीं. र।। छ २८ सफर. हे विज्ञापना.