Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१५७] श्री. ८ सप्टेंबर १७९५.
विनंति विज्ञापना. छ १८ माहे सफर गुरुवारीं रात्रीं नवाबानीं दरबारास यावें ह्मणून आह्मांस बोलाविण्यावरून जाण्यास सिद्ध झालों. इतक्यांत नवाबाकडून चोबदार आला कीं, आज मीरअलम येणार होते, तुह्मासही बोलाविलें, परंतु मीर अलम यांची तबियत कसलमंद, येण्याची ताकद नाहीं, सबब त्यांचें राहणें झालें, तुह्मीही येणें आज मवकूफ करावें. याप्रमाणें निरोप आल्यावरून ते दिवशीं दरबारास गेलों नाहीं. छ १९ शुक्रवार व छ २० शनिवार दोन दिवस मीरअलम याची तबियत मांदीच होती. यास्तव जाणें झालें नाहीं. छ २१ रोज रविवारीं इंग्रजी पलटणाचे सरदार यांची मुलाजमत झाली. तो दिवस त्याखालीं गेला. छ २२ रोज सोमवारीं दिवसा अवलवक्तीं दरबारास यावें, मीरअलमही येतात, ह्मणोन सूचना छ २१ रोजीं रात्रीं आल्यावरून, सोमवारीं दीड प्रहर दिवसा नवाबाकडे गेलों. याचा तपशील अलाहिदा पुरवणीवरून ध्यानांत येईल. र।। छ २३ माहे सफर. हे विज्ञापना.
र।। छ २८ माहे सफर मु॥ भागानगर,
रवाना टप्यावर