Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१५५]                                                                               श्री.                                                                  ८ सप्टेंबर १७९५.                                 
विनंति विज्ञापना. छ २२ रोज सोमवारीं नवाबाकडे दिवसां दरबारास गेलों. मीरअलम व राजाजी होते. नवाब बरामद होऊन सलाम झाला. इतक्यांत मुसारेमू व अजमखान व घासीमिया यांजकडील पत्रें आलीं तीं नवाबानीं वाचून पाहून आह्मांपाशीं दिलीं. त्या पत्रांत मजकूर. छ १९ सफर शुक्रवारीं बंदेअलीखान हजार स्वार व पांचशे रोहिले सदरहू जमीयतसुद्धां हुमणाबादेहून आले. ते आह्मांपाशीं षामील झाले. बेदरापासून तीन कोसावर मौजे राजापूर ह्मणून गांव तेथें आमचा मुक्काम. छ २० रोज शनवारीं अलीज्याहाबाहद्दूर यांजकडील फौजेशीं व आह्मांसी मुकाबिला झाला. अलीज्याहा जातीनें बाहेरचे किल्ल्यांत आहेत. त्यांजकडील सरदार जमीयत वासलगंजाचे अलीकडे दीड पावणेदोन कोस वाढून आली. त्याचे फौजेसी व आह्मासी तोफेच्या गोळ्याबरावर तुफावत राहिली. तेसमयीं आह्मी सर्व सरदार मयेजमीयत मुकाबिल्यास सिद्ध होऊन प्रथम तरवारेची लढाई झाली. त्यांत शेंपन्नास माणसें तिकडील ठार जखमी व इकडीलही सदरहू अन्वयें झाली. मुसारेमूकडील तोफांचे गोळ्याची शुरवात झाली. याप्रमाणें होऊन अलीज्याहा याजकडील फौज पुढें वाढून आली ते जिग्यावर गेली. आह्मी आपली जागा कायम केली. याप्रमाणें एक लढाईचें वर्तमान. पुढें होईल त्याचा अर्ज लिहिण्यांत येईल. याअन्वयें पत्रांत मजकूर होता. र।। छ २३ माहे सफर. हे विज्ञापना.