Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१६२] श्री. १३ सप्टेंबर १७९५.
विनंति विज्ञापना. अलीज्याहबहादूर यांजकडील फौजेशीं व मुसारेमू वगैरे सरदार नवाबाकडील यांशीं लढाई छ २० सफर शनिवारीं जाली. याचीं पत्रें नवाबाकडे आह्मीं समीप असतां आलीं. याचा मजकूर पेशजी विनंति लिहिल्यावरून ध्यानांत आला असेल. मुसारेमू वगैरे सरदार जमीयतसुद्धां मौजे चिटे पो।। बेदर या गांवानजीक बेदरापासून दोन कोसांवर आहेत. अलीकडे लढाई झाल्याचें वर्तमान तहकीक आलें नाहीं. सदाशिवरड्डी यास पांच सात दिवस समाधान शरीरीं नव्हतें. सांप्रत बरा झाला ह्मणून वर्तमान आहे. लढाईची खबर आली ह्मणजे लिहिण्यांत यईल. अलीज्याहा यांजकडील ठाणीं भालकी, हुलसूर, निलंगे येथें पहिलीं बसलीं. गुंजोटीसही ठाणें बसोन आलंद येथें फौज गढीशीं लढत आहे. मौजे शिरसी हा गांव गुंजोटीचा लुटून ताख्तताराज केला. लोहारे तालुक्यांतील गांव व सास्तु येथें ठाणीं घालून लूट केली. लव्हरे येथें फौज गेली. परंतु ठाणें अद्याप दाखल झालें नाहीं. याप्रमाणें वर्तमानें आलीं. र।। छ २८ सफर. हे विज्ञापना.