Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१५९] श्री. १३ सप्टेंबर १७९५.
विनंति विज्ञापना. छ २२ सफरीं नवाबाकडे गेलों, तेसमयीं मामलत प्रकरणीं जाबसाल व सनदेपैकीं हरदापूर वगैरेचे भरतीस तालुका लागणें इत्यादिक जाबसाल ठरणें ते मीरअलम व राजाजी यांनीं आह्मीं नवाबाचे दिवाणखान्यांत उदईक बसोन जलसा व्हावा याप्रमाणें ठरलें. त्याची विनंति लिहिण्यांत आली. त्यास मीरअलम दरबाराहून आपले मकानास गेले, तों हिंवज्वर त्यास येऊन दोन तीन दिवस त्यांची प्रकृति असमाधान. त्यांत छ २६ रोजीं माझेही प्रकृतीस स्वस्थ नाहीं. याजमुळें तीन चार दिवस प्रकृतीमुळें त्यांचें येणें न झालें व मीही गेलों नाहीं. इतक्यावर मीरअलम यास स्वस्थ होऊन दरबारास आले. व मलाही स्वस्थ थोडेसें होतांच जाऊन जलशांत जें ठरेल त्याची विनंति लिहिण्यांत येईल. र।। छ २८ सफर. हे विज्ञापना.