[१५६]                                                                               श्री.                                                                  ८ सप्टेंबर १७९५.                                 
विनंति विज्ञापना. छ २२ रोज सोमवारीं नवाबाकडे दरबारास गेलों. सरकारी किस्तीचा ऐवज वगैरे बोलण्यांत आणिले. याजवर तीनचार घटका बोलणें झालें. सारांश किस्तीशिवाय वरकड जाबसाल तालुक्याचे भरतीस माविजा मामलतप्रकरणी वगैरे राजाजी व मीरअलम व तुह्मीं ऐसें बसून निश्चय ठरवावा, नंतर किस्तीचा पर्याय ल्याहावा, ऐसें नवाब बोलिले. त्यास उदईक मीरअलम व राजाजी व आह्मी मिळोन नवाबाचे येथें जलसा होणार त्याचा तपशील, व किस्तीचा पर्याय यानीं काढिला आहे त्याचा विस्तार, मागाहून विनंति लिहितों. तोंपर्यंत किस्तीपैकीं ऐवज सध्यां मिळावयाचें चिन्ह दिसत नाहीं. पोकळ गोष्टी आहेत. नाद लावून दिवस गतीवर टाकून सांप्रत घरचा बंदोबस्त पहावा तसे करावे, यास्तव मोहजाळें दोस्ती व ममतेचें घालून पैका न देतां दिवस ढकलावें, असें ध्यान आहे. उद्याच्या जलसासुद्धां सर्व तपशील मागाहून लिहितों. आजच्या बैठकींतील निर्गलितार्थ भाव थोडक्यांत ध्यानांत यावा यास्तव सरासरी विनंति लिहिली. र॥ छ २३ सफर. हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries