Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१६३] श्री. १३ सप्टेंबर १७९५.
विनंति विज्ञापना. कोणाराव जमीदार, एलगंदल सरकारचा, याचा जाबसाल लष्करजंगाचे मार्फत नवाबासीं किंटनूरचा कौल आल्यास येतो. त्यावरून जमीदारास कौल पाठविला. कोणाराव निघोन येथें हैदराबादेस आला. त्यास इस्तकहाल राजाजीचे भाऊ आपाराव यास पाठविलें होतें. त्याजला जमीदार मजकूर यांनीं वस्त्रें, शिरपेंच व घोडां जिया फत केली. छ २३ रोज मंगळवारीं जमीदार याची मुलाजमत अठ्ठावीस इसमांचीं नजर झाली. कोणाराव यास मोत्याची कंठी व समागमें नऊ इसमें यांस शालफर्द दिले. जमीदार मजकूर तूर्त येथें आहे. रा॥ छ २८ सफर. हे विज्ञापना.