Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[२२७]                                                                               श्री.                                                                   २३ आक्टोबर १७९५.

विनंति विज्ञापना. नबाबानीं रघोत्तमराव यांजबरोबर सांगोन पाठविलें कीं अलीज्याह धारूरचा घाट उतरून गेले. त्यास श्रीमंतांकडील तालुकदार व आबाजी कृष्ण या कामावर मुकदर असोन कोणीही मुजाहीमत त्यास न जाले, व इकडील सरदार व फौज यांशीं सामीलही जाले नाहींत. त्यास अलीज्याह फौजसमवेत घाट उतरून श्रीमंताकडील तालुकियांतून जात आहे. त्याचे ताकुबावर इकडील सरदार जमीयतसुद्धां आहेत. तेही पिच्छा करून मागोमाग त्याच मार्गानें जातील. तेव्हां तालुकियाचा तसनस. यास्तव तुह्मीं श्रीमंताकडे लिहून त्यांच्या ताकिदा तालुकदार वगैरेस पोंहचाव्या कीं अलीज्याह फौजसुद्धां जात आहे, त्यास दरम्यान आडवें होऊन गाठावें, दस्तगीर करून इकडील सरदार यांचे स्वाधीन त्याजला करावें, याप्रमाणें लिहावें. आह्मींही श्रीमंतांस पत्र तयार केलें, हेंही रवाना करावें. याप्रमाणें निरोप सांगोन खरीता नबाबाकडील सरकारचे नांवें दिला तो सेवेशीं रवाना केला आहे. अवलोकनें पत्रान्वयें म।।र ध्यानांत येईल. राजश्री नानाचे नांवाचेही पत्र आहे. र।। छ ९ माहे र।।खर हे विज्ञापना.

छ मजकुरीं नबाब निजाम अलीखांबहादुर यांणीं श्रीमंतांस खरीतापत्र दिलें व नाना व गोविंदराव भगवंत यांचे नांवें इनायतनामे दिल्हे. ते रवाना केले. श्रीमंताचे पत्राचा मसविदा पारशी.

(पारशी पत्र)

नाना व गोविंदराव भगवंत यांचे नावें सदरहू मजकुराअन्वयें
इनायतनामें दोन याचे आलकाब पारशी.

(पारशी)