Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१५०] श्री. ३ सप्टेंबर १७९५.
विज्ञापना ऐसीजे. मुरारेमू व अजमखान वगैरेस आजपर्यंत पुढें जाग्याची परवानगी नव्हती. सरकारचे पत्राची इंतजारी करीत होते. प्रस्तुत सरकारचे जबाब आले. ते नवाबास दिले. यानंतर अजमखान व मुसारेमू यांस इनायतनामें पाठविलें कीं, श्रीमंतांकडील संशय होता, त्यास प्रस्तुत तिकडील पत्रें आलीं, त्यांजवर खातरजमा झाली, याजउपरि तुह्मीं कुच करून पुढें जावें. त्याजवरून ते कुच करून कुहिरावर गेले. तेथून तीन कोसांचें कुच करून एकहळ्ळीचे रुखानें गेलें. छ १७ सत्रावे तेरिखस एकहळ्ळीस जाणार. याप्रमाणें वर्तमान आहे. अलीज्याहा याजकडील फौज नमूद होऊं लागली. आठा चहूं दिवसांत मुकाबिला होतो. र।। छ १८ सफर. हे विज्ञापना.