Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१५१] श्री. ३ सप्टेंबर १७९५.
विज्ञापना ऐसीजे. इंग्रजी पलटणें दोन येणार होतीं तीं आलीं. छ १६ माहे सफरीं सात तोफा, पन्नास गोरे, पन्नास तुरुब स्वार, शिवाय पलटणचे लोक व दोन सरदार, या सरंजामानिशीं याकुतपु-याचे दरवाज्यानें शहरांत येऊन नवाबाचे हवेलीचे दरवाज्यावर आले. नवाबानीं सांगून पाठविलें कीं, लंगर हौदाजवळ जाऊन उतरावें. त्याजवरून नडव्याचे दरवाज्यानें शहराबाहेर जाऊन लंगर हौदाजवळ उतरले. तुरुब स्वार व गोरे आणि तोफांचे सोलदाद व पलटणाचे लोक तेलंगेसुद्धां दोन हजार आहेत. सात तोफा अकरा पेटारे याप्रमाणें सरंजाम आहे. पलटणाचे लोक पहिल्यानें होते त्याप्रमाणें हे नाहींत निरस आहेत. र।। छ १८ सफर. हे विज्ञापना.