Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१५२] श्री. ३ सप्टेंबर १७९५.
विज्ञापना ऐसीजे. सिद्दीइमामखान व नूरमहमदखान यांचे घरची जप्ती नवाबांनी केली. यांत आंगावरचे पोषाक व बायकाच्या व त्याच्या इजारा व पेशवान आले ते विकून पैका करावयासी सांगितला. पांचा रुपयांची वस्त सात रुपयांस जबरदस्तीनें विकली. प्रस्तुत अलीजाहा याचे येथील जप्ती केली. बायकावर नगनगोटे होते ते आणविले. दोनदोन पेशवान मात्र ठेविले. तोषेखाना पाहिला. त्यांत साडेसातशें रुपये नगद आणि कांहीं पोषाक होते ते आणवून सांगितलें कीं, माझे समोर आणूं नका, परस्परें विकावे, ऐवज दाखल करावा. याप्रमाणें येथीलं आचरण चाललें आहे. कांहीं कोणाकडून विपर्यास झाला असा भासं पडला ह्मणजे सरदार मुत्सद्दी सर्वांस शिव्यागाळी मनस्वी द्याव्या ऐसें झालें आहे. दौलतदार यास योग्य नाहीं तो धर्म होत चालला हें विपरीत आहे.
र।। छ १८ सफर. हे विज्ञापना.
छ २३ सफर मु॥ भागानगर
मंगळवार रवाना टप्यावर.