Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१४८] श्री. ३ सप्टेंबर १७९५.
विज्ञापना ऐसीजे. राजश्री रेणूराव व रघोत्तमराव उभयता येऊन प्रथम अलीजाहा याचा मजकूर केला कीं, हा मझेला कसा लवकर आटोपेल पहावें, सर्व तालुकियांत ठाणीं बसत चाललीं, इकडे आमदणी तालुकियांतील येणें राहिली, याप्रमाणें आहे. तेव्हां त्यास ह्मटलें, मझेला मातबर खरा, परंतु त्यास पाया नाहीं, नवाबाचा भरोसा लोकांस येईल त्याप्रमाणें त्यांचा भरोसा कोणास येणार नाहीं, रोजीकरितां चार जण जमा झाले, पैका नाहींसा होईल तेव्हां लोक तनहिदी द्यावयाचे नाहींत.
नवाबांचा भरवसा लोकांस बहुत कीं प्रसंगास पैका देतील, बारे वगैरे जमीयत कदीम तयार मजबूत, त्याजकडील नवनिगादास्त प्याद्याची जमीयत, या जमीयतीपेक्षां दुप्पट असले तरी याचे मुकाबल्यास टिकणार नाहींत, मझेल्याचे मूळ निरसन झालियावर. तालुकियाचा बंदोबस्त एके दिवसांत होईल, मसलहतीचे मार्गे अलीज्याह्य चर्ब पडतील असें दिसत नाहीं, याजवरही ईश्वराची इच्छा काय असेल ती नकळे, दैवाची जात मसलहतीशिवाय आहे. याप्रमाणें बोलणें झालियानंतर बोलिले जे, आपण अर्ज करूं ह्मटलें तें काय, ऐसें हजरतीनीं विचारिलें. तेव्हां त्यास ह्मटलें जे, नवाबानीं सांगितलें त्याप्रमाणें श्रीमंतांस लिहावें हें सलाह नाहीं, हैदराबादेस गेलियावर किस्तीची तजवीज करण्यांत येईल, याप्रमाणें नवाबानीं सांगितल्यावरून श्रीमंताशीं खातरजमेनें बोलून आलों, येथें आलियावर आजपर्यंत टाळाटाळी केली, तेव्हांपासूनच सुरुवात केली असती तर आजपर्यंत किती ओझें हलकें होतें तें न झालें, तहना माही दिला नाहीं, याजमुळें श्रीमंतांचे मनांत आंदेशा आला, याजवर आतां उमेद ठेवून रिकामा जबाब लिहिणें ठीक नाहीं, आणखी संशयास कारणही लेहोन दाखवितात, असें श्रीमंतांचे मनांत येणें हें इतिहादास चांगलें नाहीं, करारमदारांत तफावत दिसण्यांत येईल, कसेंहीकरून , करारबमोजीब हप्ता पावता व्हावा, शिवाय कामें आहेत तीं उलगडावीं, दिवसेंदिवस सफाई अमलांत येऊन आपले दौलतीचा बंदोबस्त करावयास कालहरण करणें सलाह नाहीं. तेव्हां बोलिले जे, नवाबाचें ह्मणणें कीं, कराराप्रमाणें अमलांत आणावयाचें, परंतु सध्याचे मझेल्यामुळें महालची आमदनी बंद, फौजेस पैका खर्च वरचेवर होत चालला, हा खर्च वाचवून तुमची किस्त आदा करावी तर न्याय दाद नाहीं, तुह्मास कांहीं लोपलें नाहीं, सर्व जाहीर आहे, याची शकल तुह्मीच काढून सांगावी. तेव्हां त्यास ह्मटलें, ज्याहीरदारीचा आहवाल आह्मांस दृष्टीस पडतो, परंतु घरांतील वास्तव्य ज्याचें घर त्याचे दृष्टींत असतें, तितकी खबर आह्मास कोठील, हजरतीस सर्व माहीत, तेव्हां तोड हजरत काढतील तर होईल. याप्रमाणें हजरतीस तुह्मीं अर्ज करावा आणि लवकर नवाबास समजावा ह्मणोन सांगितलें. नंतर उभयतां नवाबाकडे जाऊन सांगितल्याप्रमाणें बोलिले. दोन दिवस निरोप येईल ह्मणोन प्रतीक्षा केली. नंतर रघोत्तमराव यास बोलावून ह्मटलें कीं, दोन दिवस झाले, कांहीं समजलें नाहीं, पुन्हा मागती हजरतीस आह्माकडून अर्ज करावा आणि लवकर जबाब द्यावे. त्याजवरून मशारनिल्हे नवाबाकडे जाऊन बोलिले. नवाबानीं सांगितलें कीं, त्याच फिकीरींत आहों, मीर अलम यास समाधान नाहीं, त्यास अमळशी फुरसत झालियावर घरची मंडळी बसवून याची तोड काढून तुह्मांस बोलावून बोलण्यांत येईल. त्यास मीर अलम यास समाधान झालियावर सांगावें, ही फुरसत यानीं घातली आहे. दों चहूं दिवसानंतर काय सांगतील त्याप्रमाणें सेवेसी लिहीन. र।। छ १८ सफर. हे विज्ञापना.