Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१३७] श्री. ३१ आगस्ट १७९५.
विनंति विज्ञापना. मुसारेमू व घासीमिया व अजमखान व इसामिया वगैरे सरदार संगारडीहून मुसा जामबत्तिसाच्या जमीयतसुद्धां पोहोंचल्यानंतर कूच करून सदाशिवपेठेअलीकडील नाल्यावर राहिले, याची विनंति लिहिलीच आहे. तेथून मुसा मजकूर वगैरेनीं कूच करून बुध वारचा मुक्काम केला. तेथून मौजे जिरंपल्ली कुहिराचे बराबरीस गांब आहे तेथें जाऊन उतरले. जिरंपल्लीहून बेदर बारा कोस आहे. बेदरास जाण्याचा रस्ता सदाशिवपेठेंतून संगमचा नीट. परंतु तो रस्ता सोडून संगमाकडे न जातां जमीयतसुद्धां कुहिरच्या सुमारें जिरंपल्लीकडे आले. सबब कीं, बंदेअलीखान हुमणाबाद येथें अडीच तीन हजार जमीयतसहित आहेत, त्यास आपल्यांत सामील करून घ्यावें, सर्व फौज एकत्र करून मग बेदराकडे जाण्याचा इरादा करावा. या मनसब्यानें संगमावरून बेदराकडे न जातां कुहीरचे बराबरीस मुसारेमू वगैरे सरदार मुक्काम करून आहेत. बंदेअल्लीखान हुमणाबादेहून त्याजपाशीं पोहोंचण्याची तजवीज आहे. याप्रमाणें वर्तमान ऐकण्यांत आलें. इतक्यावर कूच मुक्काम कोणीकडे होत हें वर्तमान येईल त्याप्रमाणें विनंति लिहीन. रा।। छ १५ माहे सफर. हे विज्ञापना.