[१३८]                                                                               श्री.                                                                  ३१ आगस्ट १७९५.                                  
विनंति विज्ञापना. अलिजाहबहादूर साहेबज्यादे बेदरांत आहेत. चिंचोली येथील ठाणें पेशजींज कुहिर, तांडूरसुद्धां घेऊन भालकीकडे संगारड्डी वगैरे सरदार बारा हजार जमीयतसुद्धां पाठवून गढी व पेंठ घेतली. महमद इसफ दफेदार पागेवाल्याकडील तेथें होता. तो निघून गेला. गांवांतील ष्याद्यांनीं गोळी वाजविली. अलीजाहा यांचे लोकांनीं हल्ला करून शिरले. लूट झाली. तेथून भातांब-याचें गांव लुटून चिटगोंद्यांत ठाणें घातलें. रयत व जमीदार कितेक धरिले. कांहीं गेासावी व कोमटी हातीं लागले त्यांजपासून खंड घेतला. हुमलाबादेवर तीन हजार फौज हिजेखान वगैरे गेले, तेथें बंदेअलीखान यांची त्यांची लढाई होऊन दोनतीनशें माणसें यांचीं व शेंदीडशें बंदेअल्लीखानाकडील ठार जखमी झालीं. जमीयत फिरून आल्यानंतर सदाशिवरड्डी पांच सात हजार फौजेसुद्धां हुमणाबादेस जाऊन घेरा घातला. बंदेअल्लीखान जमीयतसुद्धां बाहेर निघून लढाई झाली. रड्डीमजकूर यांनीं पेठेपर्यंत कस्त केली. इतक्यांत अलीजाहाबहादूर यांचें पत्र सदाशिवरड्डीस आलें कीं, मुसारेमू वगैरे सरदार जमावसुद्धां संगमा कडे आले, बेदरास येण्याचा इरादा, यास्तव हुमणाबादेचे शहास न गुंततां तुह्मीं पत्रदर्शनी जमीयतसुद्धां बेदरास. येणें. त्यावरून सदाशिवरड्डी जमावसुद्धां बेदराकडे येऊन जमीयत एक जागीं केली. याप्रमाणें वर्तमान आहे. र।। छ १५ माहे सफर. हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries