Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१३९] श्री. ३१ आगस्ट १७९५.
विनंति विज्ञापना. आसदअल्लीखान याजकडे पेशजी कडपे तालूका व गुंडमटकल, नारायणपेठ, लोकापल्ली हे महाल होते. नवाब हैदराबादेस आल्यानंतर कडपे तालुक्याची सनद अमीनखान अरब यास दिली. गुंडमटकल वगैरे महाल अमीनानें व्यंकटराव सुरापूरकर यांजकडे सांगितले. खानमजकूर तगीर झाले. दरम्यान अलीजाबहादूर यांचा मझेला उत्पन्न झाल्यानंतर जमीयतीचें प्रयोजन जाणून नबाबांनीं आसदअल्लीखान याची खातरजमा करून पहिलें फाजील येणें त्याचा जाबसाल एकीकडे ठेवून चार महाल वगैरे घटाळ्याकडील जहागीर आदिकरून तेरा लाखांचा तालुका नवजमीयतीकरितां दिले. मोहरमअखेर जमीयतसुद्धां येण्याचा करार करून खानमजकूर रुखसत होऊन गेले. बेगनपल्ली येथें आहेत. अर्ज्या येतात कीं, गुलामबा जमीयत हजर होता. कडपे तालुक्यांत कबजा त्याजकडीलच आहे. गुंडमटकल वगैरे महालीं व्यंकटराव व त्रिमलराव सनद घेऊन गेले. गुंडमटकलचे किल्ल्यांत आसदअलीखानाचा पुत्र रजाअलीखान जमीयतसुद्धा आहे. त्यास अलीजाहाबहादूर याचें पत्र आलें कीं ठाणें न देणें. त्यानें व्यंकटराव यास गुंडमटकल व उटकर हीं ठाणीं न देतां बळाविलीं आहेत. नारायणपेठ व लोकापल्ली व मदूर तीन ठाणीं व्यंकटराव याचे स्वाधीन झालीं. ते तेथेंच आहेत. रजाअल्लीखान यास ठाणीं वागुजास्त करावीं ह्मणून आसदअल्लीखानाचीं पत्रें येतात. मग जाहीरीचीं किंवा खरें काय असेल तें असो. रजाअल्लीखान ठाणीं सोडीत नाहींत. त्याचे कुमकेस अलीजाहा याजकडील जमीयतही येणार. याअन्वयें नवाबास व्यंकटरावाच्या अर्ज्या आल्या. मीरइमाम जमीयतसुद्धां बेदरास अलीजाहा याजपाशीं जाऊन भेटला. त्यास हत्ती, घोडा व वस्त्रें दिलीं. मीर इमाम जमीयतसुद्धां रजावळीस येऊन ते व हे एकत्र होणार ह्मणून वर्तमान आहे. र।। छ १५ माहे सफर. हे विज्ञापना.