Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१४०] श्री. ३१ आगस्ट १७९५.
विनंति विज्ञापना. तेजसिंग खंदारकर नबाबाकडील पहिला सरदार याचे पुत्र कुंवर विजयसिंग याजकडे कसबे खंदारचा किल्ला व किल्ल्याचे व जातीचे सरंजामांत मिळून एक कसबा खंदारचा होता. त्यास खंदारचा किल्ला त्यास बलावून अलीजाहाबहादूर याजकडे पैगाम लागला. दोन हजार जमीयत येऊन खूळ माजविलें. याप्रमाणें नबाबाकडे वर्तमान आलें, व तालुक्यांत तिकडे ठाणींही घालतो, याप्रमाणें वर्तमान आहे. र ॥ छ १५ माहे सफर. हे विज्ञापना.