Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१४१] श्री. ३१ आगष्ट १७९५.
विनंति विज्ञापना. देगळूर, सारवड, खडक, बाराहळ्ळी, कोंडलवाडी घासीमियाकडील तालुके येथील जप्ती अलीजाहाबहादूर यानीं तिमाराव हरीकडे सांगितली. त्यांजकडील दखल झाल्यावर पागावाले यानीं कोन्हेर हरी तिमाराव यांचा वडील भाऊ यास सनद देऊन नजफअल्ली जमातदारसमागमें दोन तीन हजार जमीयतसुद्धां महालचे बंदोबस्तास रवाना केलें. पागेवालेकडील आमील व जमीयत गेल्याचें वर्तमान अलीजाहा यांस समजल्यानंतर त्यानीं गालबजंग सैफजंगाचा पुत्र यास तीन चार हजार जमीयतसुद्धां देगळूर वगैरेकडे पाठविलें. तजफअल्ली व कोन्हेर हरी यांशीं व गालफजंगाशीं लढाई होऊन नजफअल्ली मारला गेला. कोन्हेर हरी पळून गेले. जमीयत फरारी झाली. पागेचीं घोडी व उंट वगैरे सामान सरंजाम गालफजंग याचे हातीं लागलें. याप्रमाणें वर्तमान आलें. र।। छ १५ माहे सफर. हे विज्ञापना.