Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१०५] श्री. ९ आगस्ट १७९५.
विनंति विज्ञापना. संस्थान अदवानी येथील स्वराज्याचा ऐवज सन १२०४ पासोन पेशजीचे मख्त्याबमोजीब सालाचे सालास महालीं फडच्या होण्याचा करार. त्याप्रमाणें तेथील अमीलास इनायतनामा द्यावा ह्मणजे सरकारांत रवाना करूं. याअन्वयें नवाबाशीं बोलणें होऊन राजाजी यास परवानगी सुदामतप्रमाणें फैसल्याविषयीं इनायतनामा तयार करण्याची जाली. त्यास, राजांजी यांचें ह्मणणें कीं महाबतजंगाकडून कारभारी अनवरुद्दोला येथें आहेत. त्यांनीं याद हजरतीपाशीं दिली. त्यांत कसरात होन वगैरे खर्च सालाबाद तेवीस हजार रुपयेप्रमाणें पाऊणेदोन लाखाचे मख्त्यांत वजा होऊन बाकी ऐवज जिन्नस व नगदी फडच्या होत आला. या बमोजीव पेशजीची वहिवाट आहे. यास मागील वहिवाटीचे सिलसिल्याअन्वयें पुढील फैसल्याविषयीं ताकीदपत्र तयार करवून देतों. याप्रमाणें राजाजी यांचें बोलणें. याचें उत्तर आह्मी केलें कीं अदवानीचे स्वराज्याची चालवहिवाट अशी नाहीं. पावणेदोन लाख रुपये बेगलगष सरकारी अम्मल, त्याप्रमाणें सालफडच्या व्हावा, ऐसा इनायतनामा झाल्यास घ्यावा. नाहीं तर आपण ह्मणतात याअन्वयें इनायतनामा आह्मीं घेणार नाहीं व सरकारांत मंजूर कसा पडेल? सालाबाद मागील वहिवाट अशी ह्मणता. त्यास सरकारचे मामलेदार अथवा ज्यांनीं ऐवज घेतला असेल त्यांच्या रसीदा दाखवाव्या. ह्मणजे सरकारांत त्याप्रमाणें विनंती लिहिण्यांत येईल. याप्रमाणें बोलणें होत आहे. अदवानीप्रकरणीं जाबसाल यामुळें तटला आहे. त्यास सरकारांत पेशजी अमलाची वहिवाट दप्तरीं असेल त्याचा शोध होऊन आज्ञा येईल त्याप्रमाणें यासी बोलणें होईल. राजाजी यांचेही बोलण्यांत कीं श्रीमंतांचे सरकारांतही सालाबाद वहिवाट असेल ते लिहून आणवावी. त्यास वहिवाटीचे यादीसहीत आज्ञा येईल त्याप्रमाणें बोलून इनायतनामा घ्यावयास येईल. 'र।। छ २३ मोहरम. हे विज्ञापना.