Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१०६] श्री. ९ आगस्ट १७९५.
विनंति विज्ञापना. होणगुंद्यापैकीं गांव कयामन्मूलूक यांनीं दाबले ते सोडावे, व मुद्गलबाबत स्वराज्याचा ऐवज दरसाल आठ हजार रुपयेप्रमाणें राहिल्या दिवसापासून फडच्या कराराप्रमाणें व्हावा, या कलमांचा जाबसाल राजाजी यांसी बोलण्यांत आला. त्यास, यांचें ह्मणणें कीं, मुद्गलबाबत ऐवज कोणेसालापासून राहिला, त्यांत वसूल काय पोहोंचून बाकी राहिली, किंवा सालीम ऐवज रहात आला याची तादाद समजावी, व होणगुंद्याचे गांवचाही तपशील तेथून लिहून आणवावा, त्याप्रमाणें कयामन्मुलूक यांस ताकीद करण्यांत येईल, याद आली ह्मणजे फडच्या करून देण्यांत येईल. त्यावरून विनंति कीं, यांचे तपशिलाची याद सरकारचे दप्तरांत असेल त्याचा शोध होऊन रवाना व्हावयास आज्ञा जाली पाहिजे. सरकारची सनद होनगुंद्याची दिल्ही, त्यांत कोणती संमत, काय बेरीज लागली, देहे वाटणी सनदेंत कशी आहे, याचा दप्तरीं सर्व दाखला आहे. सनद बरोबर आहे त्याचे नकलेविषयीं आज्ञा जाहली पाहिजे. सरकारसनदेशिवाय काय जाजती दाबलें तें तपशीलवार आज्ञा जाली पाहिजे. कयामन्मुलुक यांचें ह्मणणें, सनदेंत मोघम बेरीज आहे त्याप्रमाणेंच आह्मांकडे आहे. असे त्यांचें ह्मणणें. परंतु हें प्रमाण नाहीं. मोघम बेरजेखालें आणखी दाबलें आहे. त्यास काय दाबलें याची देहबदेहीविशीं आज्ञा लवकर जाली पाहिजे. र॥ छ २३ मोहरम. हे विज्ञापना.