Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१०९] श्री. ९ आगस्ट १७९५.
विनंति विज्ञापना. इकडे पर्जन्य मृग नक्षत्राचे दोन तीन प्रथम लहान मोठे झाल्यानंतर पुष्य नक्षत्रापर्यंत पर्जन्य अगदीं उडाला होता. हल्ली आश्लेषा नक्षत्राचे पाऊस नक्षत्रा आरंभापासून तीन चार रात्रीं दिवसा असे पडले. चारा चहूंकडे जाला. हैदराबादचे आसपास तालुका धरून बेदरपावेतों. पाणी चांगलेंच आहे. हल्लीं येथें शहरांत धारण, जोरी आठ नऊ शेर, तांदुळ सात शेर, हरभरे साडे सात शेर, याअन्वयें तूर्त आहे. अद्याप तळीं आणि विहिरीस पाणी आलें नाहीं. नहर शुष्क जाले ते ज्यारी जाले नाहीत. जमिनी पुरत्या भिजल्या नाहींत. हरळीचे खुरपण मात्र जाले. पिकाचा पर्जन्य अद्याप नाहीं. र।। छ २३ मेहरम. विज्ञापना.
छ २६ मोहरम, मुक्काम भागानगर,
रवाना टप्यावर