Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[८७] श्री. २३ जुलै १७९५.
विनंति विज्ञापना. अलिजाहबहादूर यांजकडे नबाबांनी खुषरकमखान त्यांचे वस्ताद व दिनकरराव वकील सदाशिवरड्डीकडील, या उभयतांस पाठविलें होतें. पैकीं खुषरकमखान तेथून जाऊन शहरास आले. नवाबास इतल्ला जाहल्यानंतर राजाजीस हुकूम झाला कीं, खुषरकमखान काय सांगतात तें दर्याफ्त करून अर्ज करणें. त्याप्रमाणें राजाजींनीं त्यांस विचारिलें. खानमजकूर यांचे सांगण्यांत कीं, बमोजिब इर्षाद तेथें गेलों, साहेबजादे यांची भेट झालीच नाहीं, एक दिवस नाजमन्मुलूख यांची गांठ पडून बोलणें झालें, त्यांचें ह्मणणें कीं, अव्वल पानगळाडून पट्टणास मोहिमेस जाणें तेसमयीं मी वडील असतां मुसीरुलमुलुख यांचा अर्ज खातरमुबारकेत गुजरून शिकंदरजहा यांची रवानगी झाली; दुसरें हैदराबादेहून बेदरास जाणेचे वख्तीं स्वारीसमागमें सर्व साहेबजादे घेऊन हैदराबादेंत राहण्याचा इर्षाद झाला; तिसरे, बेदराहून खरड्याचे मोहिमेस जाणें तेवेळेस तरी स्मरण व्हावें तें न झालें; इतक्याही गोष्टी अजमुलउमरा यांचे सांगितल्यावरून झाल्या, ऐसें समजोन उगाच होतों; त्यांचे फळ तो पावला; हजरत शहरास दाखल जाहले; मी खुषी मानली; पुढेंही मर्जी बेरुख पाहिली; सबब विचार होऊन निघालों ; बखैरियत बेदरदाखल जाहलों; हजरतीनीं संतोष मानून उमेद हसल व्हावी या अन्वयें नाजमन्मुलूख यांनीं निरोप सांगून साहेबजादे याजकडील पत्रें हजरतीस व बक्षबिगेम व तुह्मांस ऐशीं तीन मोहरांनशीं दिलीं; रुखसत देऊन वाटे लाविले; दिनकरराव यास सदाशिवरड्डीनें पाहरे ठेवून बंदोबस्त केला. याप्रमाणें खुषरकमखानाचे जबानीं मजकूर ऐकून राजाजींनीं नवाबास अने केला व पत्रें नबाब व बक्षीबेगम व राजाजी यांचे नांवें आलीं तीं वांचून पाहिलीं. र॥ छ ६ मोहरम. हे विज्ञापना.