Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
पैक्याचा लोभ सुटत नाहीं. श्रीमंताकडील पैका कराराप्रमाणें घ्यावा असें कोणी बोलिल्यास नवाब काय करील नकळे! या धाकामुळें कोणी बोलूं शकत नाहींत. दिवस काळाचे सर्व घालवितात. असा प्रकार येथील आहे. त्यास, सर्वांप्रमाणें मी तमाषबिनी करीत असावें. होणें तेव्हां सर्व होईल. धोसरा रात्रंदिवस बाळगावा, यांत काय विशेष ? माझे येण्यांत एक विशेष आहे. येथील अर्थ सर्व स्वामीचे ध्यानांत आणून देईन. नवाबाचे घरच्या मनुष्यानें धैर्य करवून नवाबाशीं बोलवत नाहीं. स्वामींनीं नवाबास समजावून खातरजमेनें सांगितल्याखेरीज क्रम चालणार नाहीं. यास्तव स्वामीची आणि नवाबाची भेट होऊन घरोब्याचीं बोलणीं व्हावीं, अलिजहा याचा बंदोबस्त व्हावा, सरकारचीं कामें नवाबाकडून उलगडून घ्यावीं, नवाबास तर संकट पडूं नये, या षकला काढून जवा दोहीं दौलतींचा बसावा, हें मी आलियावेगळें फक्त लिहिण्यानें कसें घडेल ? प्रस्तुतकाळीं कालवाकालव जाहली. या प्रसंगास लिहिण्यानें कांहीं व्हावयाचें नाहीं. उगीचं येथे बसून कागद मात्र लिहीत जावें इतकें आहे. सरकारी काम करून घेतल्याशिवाय मी येऊं नये. परंतु समय विलक्षण. मला पत्र लिहिण्यासही बहुत विचार पडतो. नवाबाचे दौलतीस मोठा धोका बसावयाचा समय. या वेळेस स्वामींनीं उपेक्षा करूं नये. उपेक्षा केलियास सरकारासही उपयोग नाहीं. स्वामी ह्मणतील, खर्ड्यावर नवाबाचे तर्फेनें खातरजमा केली, आणि आतां तपशील लिहीत बसले, आणि एक एक कवाईत आह्मांस दाखवितात. त्यास, खर्ड्यावर खातरजमा केली ती खरी, आतां ही जें लिहितों हा उगीच तपशील लिहीत नाहीं, स्वामीचे पाय सोडून मला हैदराबादचें राहणें सुख नाहीं, कार्य करून लवकर पायांजवळ येतों, असेंच येते वेळेस बोललों आहे. भविष्याची गोष्ट वेगळी ! अलिजाहास बुद्धि आठवून मलतेंच उपस्थित झालें ही कल्पनाही नव्हती. ईश्वराची लीला विचित्र! परंतु त्यांतील सिद्धांत हाच आहे जे नवाबांनीं स्वामीशीं करार केला हा निभावेल. स्वामींनीं मनः पूर्वक या दौलतीकडे पाहिल्यास फंद मोडून नवाबाची खातरजमा होते यांत संदेह नाहीं. यास दिवसगत लागत नाहीं. स्वामीची उपेक्षा होईल तितकें मात्र काळहरण. मागती काम पडल्यास नवाबाकडे येईन. परंतु या वेळेस बोलावून घ्यावे यांत दोहीं दौलतींस सलाह असें वाटतें. याजवर जशी मर्जीं. ताबे मर्जीच्या. विशेष काय लिहावें. र॥ छ ६ माहे मोहरम. हे विज्ञापना.