Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[८४] श्री. २३ जुलै १७९५.
विज्ञापना ऐसीजे. मिस्तर किरकपात्रीक इंग्रजाकडील याचा निरोप मजकडे आला होता जें, आमचीं दोन पलटणें पहिल्याप्रमाणें नबाबांनीं अलिजाह प्रकर्णाकरितां आणविलीं तीं येत आहेत, त्यास अलिजाह याजवर रवाना करतील, जर श्रीमंतांचें मानस अलिजाह याजवर हीं पलटणें न जावीं असें असल्यास जाणार नाहींत, अथवा श्रीमंतांकडून अलिजाह यास कुमक थोडेबहुत स्वार आले तर आमचीं पलटणें जाणार नाहींत, नवाबाचे संरक्षणास मात्र राहूं, अलिजाह याजवर जा ह्मटल्यास कबूल करणार नाहीं, याचे काय तें सांगावें ? तेव्हां त्यास सांगून पाठविलें कीं याविषयी आमचे खावंदाकडून कांहीं मला आज्ञा आली नाहीं, तेव्हां काय सांगावें ? हे ऐकून उगाच राहिला. उत्तर केलें नाहीं. याप्रमाणें जाहलें वर्तमान सेवेशीं लिहिलें आहे. याविषयीं आज्ञा येईल तसें त्यास कळवीन. संकेतेकडून आज्ञा यावी. र।। छ ६ मोहरम. हे विज्ञापना.