Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[७६] श्री. २३ जुलै १७९५ .
विज्ञापना ऐशीजे. मुनसी व सरबुलंदजंग उभयतां जाऊन नवाबाशीं बोलले जे, त्याचें बोलणें साफ आहे ह्मणोन बयान करून बोलले आह्मीं या कामांत नाहीं, आमचा दस्तऐवज निघावयाचा नाहीं, तुह्मीं आमचे सरकारांत राजकारण केलें असेल तें दस्ताऐवजानिशीं श्रीमंत काढतील, गोष्ट लांबणीवर जाईल, यासमयीं सफाईची चाल अधिक असावी हें चांगलें. असें, त्याचें ह्मणणे, हें ऐकून नवाब बोलिले कीं, खरें आहे, या गोष्टी न काढाव्या, पुढें सफाईचा मार्ग त्याशीं बोलावा. ऐशी आज्ञा केली. मुनसीनीं दुसरे दिवशीं सांगून पाठविलें कीं, आपण गाझे येथें यावें, मीं हजरतीस पुसून घेतलें, सर बुलंदजंगही येतील, येथें सर्व दरजे बोलण्यांत येतील. याचें उत्तर त्यास सांगून पाठवावें, इतकियांत मीरअल्लम याजकडून निरोप आला कीं, मुनसीनीं आपले येथें येण्याविशीं अमजमुन्मुलूक यास ह्मटलें, त्यांनी जवाब दिला कीं, सर्वकाल गला हुजूर रहावें लागतें, माझें येणें कसें घडेल, मला ह्मणत होते, मीं जवाब दिला जे तुह्मीं बोलाल त्यांत. मी आहे, राजाजी तेथें होते, त्यांनीं हें ऐकून त्याचे मनांत आलें कीं, परभारें मुकदमा जातो, मी हातपाय कां न हालवावे, ह्मणोन नवाबाजवळ बोलिले कीं, हजरत मला इरषाद झाला तर गोविंदराव कृष्ण याजकडे जाईन, माझा त्याशीं कदीम सिलसिला आहे, आतां जाऊन त्याशीं सफाई करून दौलतखाहीनें सलाह पुसून येईन, हजरत बोलिले कीं, बेहत्तर आहे. त्यास राजाजी तुह्मांकडे येणार आहेत. अशी खबर मीरअलमानीं सांगून पाठविली. मनन केलें तों सारी बचबच. ताळ नाहीं. मुनसीनीं यास सांगून पाठविलें कीं, सर बुलंदजंग व मीरअलम यास तुह्मीं बोलावून आपले येथें हुजूरचे परवानगीनें आणावे, ते आलियावर आह्मीं येऊं. बोलिले, उत्तम. चार पांच घटिका रात्र झालियावर राजे रेणूरावजी आले. यास पुसिलें कोणीकडे येणें झालें. बोलले, हजरत मला ह्मणत आहेत कीं तूं बाहेर खेमे दाखल होऊन फौजेची गिर्दावरी करावी, उदईक जाणार, आपला निरोप घ्यावा, सलाह जाण्याची पुसावी, ह्मणून आलों. नवाबास कळवून आला किंवा तुह्मींच आला ऐसें पुसलें. आज्ञा घेऊन आलों. त्यास माझें निघण्याचें वर्तमान सांगून पुढें दौलतखाही जे सलाह काय सांगतील ती पुसतों, ऐसें बोलून आलों, त्यास ह्मटलें कीं, फौज जमा करण्याचा तुमचा विषय नाहीं, मग या कार्यावर का तुह्मांस योजले.