Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
याचें उत्तर नाहीं. काय लिहावें लागतें हें मनांत येऊन नवाब बोलिले कीं, याचा जवाब देऊं, त्याजवर तुह्मी बोलाल, तकरार बोलण्याची अधिक होते, हें राहूं द्यावें, पुढें दौलतखाही करावियाचें बोलावें, ऐसें ह्मणों लागले. तेव्हां बोलिलों जे, आपण करार केला. त्याप्रमाणें, अमलांत आणावें, मीही दौलतखाहींत कसूर करणार नाहीं. तेव्हां ह्मणूं लागले जे, शास्त्रार्थाचें बोलणें बोलूं नये, करूनचं दाखवा. तेव्हां विनंति केली जे, करूनच दाखवीन, यांत संदेह नाहीं, परंतु जिम्मा असें बोलत नाहीं, कारण खाविंदीचा दर्जा तिकडे आहे, यास्तव माझें बोलणें हजरतीस अप्रमाण वाटूं नये, दुसरी गोष्ट खावंदाशीं प्रतरणा करून तुमची दौलतखाही करावी हें मजकडून घडावयाचें नाहीं, खावंदास अर्ज मारून करून मर्जी खुष करून करीन याविषयीं संदेह मनांत येऊं नये. ऐसें बोलून एक गोष्ट बोललों जें, कित्येक गृहस्थांनीं हजरतीस समजाविलें आहे कीं, श्रीमंत व मदारुमहाम यांनीं आह्मांशीं करार केला आहे. जे, तालुका घेऊं नये, असें असतां बदले गोविंदराव कृष्ण यानीं श्रीमंतांचे घरांत बळेंच तालुका घातला, यांत दोहींकडे शब्द, एकतर माझे खावंदाचे करारास दोष आणला दुंसरा दोष मजकडे आणला, याची संशयनिवृत्ति झाली पाहिजे, मलाही खावंदांनीं लिहिलें आहे कीं, आमचा करार कोणांपाशीं असा असेल तो काढावा, याविषयीं तुह्मीं नवाबाशीं बोलावें, त्यास याची चौकशी हजरतीनीं करावी, मोघम ठेवूं नये; दोन्ही दौलती मोठ्या, यांत लटके संशय घालणें हें चांगलें नाहीं, याची जुजरशी जरूर व्हावी. यावर नवाब बोलिलें कीं, ही गोष्ट आतां राहूं द्यावी, मुलाकातीवर ठेवावें. मीं ह्मटलें, उत्तम आहे, मुलाकातीवर ठरलें तेव्हां माझा संशयही हजरतीनीं मनांत ठेवूं नये, काढून टाकावा, मुलाकातीचे समयीं सर्व निदर्शनास येईल. तेव्हां बोलिले जे, संशय मनांत ठेवीत नाहीं. नंतर आणखी बोलिले जे, आजचा प्रसंग अनायासें घडला, मी कोणाची नालिष हजरतींजवळ केली नाहीं, आणि माझा असा संप्रदायही नाहीं, बलके उपकारच कोणावर केला असेल, आजचे मजालसींत जे नसतील ते वाईट मानतील, आणि एखादी आदावत आणतील, हजरतीस समजावतील, तें खातर मुबारकेत न यावी. बोलिले जे, मनांत येणार नाहीं. मी निःसंशय असूं, असें बोलिल्यावर खातरजमेनें असावें ह्मणून आज्ञा झाली. दोन प्रहर रात्र झाली तेवेळेस निरोप घेऊन घरास आलों. अजमखान यास नवाबानीं सांगितलें कीं, घासीमिया एकटे बाहेर फौजेंत आहेत, यास्तव तुह्मीं जाऊन लोक लवकर जमा करून उदईक कूच करून मुसारेमूजवळ पट्टणचरूस जावें. त्याजवरून ते प्रहर रात्र असतां तेच दिवशीं गेले. याप्रमाणें ते दिवशींचें वर्तमान. र।। छ ६ मोहरम. हे विज्ञापना.