Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१४७]                                                                               श्री.                                                                  ३ सप्टेंबर १७९५.                                 
विज्ञापना ऐजीजे. किस्तीचे ऐवजाकरितां सरकारचें पत्र नबाबास आलें तें दिलें. त्याप्रकरणीं बोलणें झालें तेंही पेशजी लिहिलें आहे. अलीजाहा याचे मझेल्यापासून फारकत झाली, यानंतर याचा मार्ग होईल, असें नवाब बोलिले. त्याचें उत्तर मीं दिलें कीं, याविषयीं पुन्हा अर्ज करीन, नंतर हजरत सांगतील तसें लिहून पाठवीन याप्रमाणें बोलून घरास आलों. पाठीमागें नवाबास बोलिले जें, आह्मीं बोललों हें रावजीचे मनास आलें नाहीं, ह्मणोन पुन्हा अर्ज करीन असें बोलिले, त्यास तुह्मीं जाऊन त्यांस पुसावें. ह्मणोन राजे रेणूरावजी यांस सांगून लागलेंच पाठविलें. रेणूराव नवाबापासून उठोन खालीं आले. खिलवतीचे दिवाणखान्याचे दरवाजेपर्यंत मीं आलों, तों रेणूरावजी पाठीमागून आले. बोलिले जें, हजरतीनीं पुसिलें आहे कीं काय अर्ज करणार आहेत हें पुसून यावें. त्यास सांगितलें जें, उभ्यानेंच काय बोलावें, फुरसतीनें गाठ पडल्यास बोलण्यांत येईल. नवाबास अर्ज याप्रमाणें करून मी येईन ह्मणोन बोलोन गेले. मी घरास आलों. त्यानंतर राजश्री रेणूराव व रघोत्तमराव दुसरे दिवशीं माझे येथें आलें. बोलणें झालें. त्याचा तपशील अलाहिदा लिहिला आहे, त्याजवरून ध्यानास येईल. र।। छ १८ माहे सफर. हे विज्ञापना.