Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[७८] श्री. २३ जुलै १७९५.
विज्ञापना ऐशीजे. रेणूराव रात्रीं जाऊन नवाबाशीं बोलले. प्रातःकाळीं चोबदार बोलावूं आला. गेलों. खाले दिवाणखान्यांत सर्व बसले होते. तेथें जाऊन बसलों. इतकियांत नवाबाजवळून रेणूरावजी उठोन मजकडे आले. बोलावयाचें आहे, ह्मणोन एकीकडे घेऊन गेले. रोषनराव व त्याचे व्याही यशवंतराव-पातशाही दफ्तरचें काम त्यांजकडे आहे, ते होते. ते बोलिले जे, आपणाशीं काल बोलणें झालें त्याप्रमाणें नवाबाशीं बोलून आपले तरफेची खातरजमा नवाबाची केली, आपणास श्रीमंतांकडे पत्र लिहिण्याविषयीं सांगितल्या. विषयीं खुलाशानें बोलावें, रघोत्तमराव यांचें सांगितल्यावरून अथवा कसेंही मजकडून अंतर पडलें असेल त्याची क्षमा करावी, ह्मणोन नमस्कार करून पोटांत डोई घातली. याजउपरि कदाचित् मजकडून अंतर दिसल्यास कानास खडा लावावा, मी तुह्मावेगळ नाहीं, माझे येथें सर्व दुषमन होऊन लागले आहेत, चहूंकडून मार होत आहे, कुलयातींत मला बुद्धि नाहीं, सर्व निभावणें आपलेकडे आहे, ह्मणोन घाबरें होऊन बोलूं लागले. तेव्हां त्यास ह्मटलें, नवाबाची दौलतखाही इच्छितां तशीच श्रीमंतांची दौलतखाही करावी, जें बोलतां हें दृढ असावें, तुह्मीं बोलतां याप्रमाणें चाल तुमची असल्यावर आमची चाल तशीच राहील, याविषयीं खातरजमा ठेवावी, घाबरें न व्हावें, कोणाचे बुद्धीस लागूं नये. ऐसा दिलासा दिला. नंतर नवाबाकडे गेलों. सलाम झाला. बसलों. मीरअलम, सरबुलंदजंग व मुनसी जवळ होते. सर्वांचें मानस रावजीनीं आमची प्रतिष्ठा नवाबाजवळ विशेष होय असें करावें, आणि सलाह मसलहतींत नवाबानीं घ्यावें असें घडावें. एकटे राजाजी पुढें लागतील ते शहाणे आणि आह्मीं वेडे कीं काय ? आमचेदेखतचें पोर आह्मापुढें उड्या मारूं ह्मणतो, हें कसें घडेल? यास अक्कल तरी काय आहे? वास्तविक पाहतां खरेंही आहे. या कार्यास मोठें ओझील मनुष्य पाहिजे. तो ऐवज तर कोणांतही नाहीं. बुद्धि असून कोणी कृत्रिम, कोणी लबाड, कोणी घातकी, कोणी सरळबुद्धि प्रामाणिक. परंतु कतृत्वशक्ति नाहीं. कोणी भडभडे, परिणाम बुद्धीचा नाहीं, कोणी मूर्ख सालस, कोणी मूर्ख दुष्ट, अशा नाना प्रकारच्या विकृति आहेत. धासीमिया व आजमखान तर लष्करांत. जवळचे मजलसीचीं मनुष्यें याप्रकारचीं. यजमानाचे बुद्धीचा निश्चय पक्का दृढ असलियावर इतक्या विकृतीचें साधन राखण्याचेंही प्रयोजन नाहीं. तेथें चलबिल. तेव्हां एकास धरावें, एकास सोडावें, तेंही ठीक नाहीं. आजच नाशास कारण होणार. यास्तव सर्व समेटून चालणें प्राप्त. नवाबाजवळ जाऊन बसतांच मीरअलम याजकडे नवाब पाहून बोलतात कीं, आजपर्यंत मला यांचा संशय होता, आतां यांचे निखालसपणाविशीं खातरजमा झाली, कृष्णरावजी यांचे प्राणानें आसर केला असें वाटलें. याचें उत्तर मी नवाबास केलें कीं, मी निखालस पूर्वींपासून आहे, खरड्यावरचा मुकदमा निखालस ते वेगळ व्हावयाचा नव्हता, परवां सरबुलंदजंग व मुनसी व अजमखान त्रिवर्ग, असतां विनंति केली त्यांतही निखालस बोलणें झालें,