Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[७४] श्री. २३ जुलै १७९५.
विज्ञापना ऐशीजे. खरड्याचे जाबसालांत नवाबाचे हुकमाप्रमाणें मीरहैदरखान मुनसी व आजमखान व घामीमिया व अर्जबेगी व सरबुलंदजंग इतके होते. तेवेळेस. इतक्यांचीं वचनें घेतलीं होतीं कीं, नवाब बोलले आहेत त्याप्रमाणें निभावतील. याविषयी अर्ज करून निभावून देऊं. याविषयीं सर्वांनीं नवाबास पुसून वचन दिलें. हैदराबादेस आलियावर विप्र पुढारी झाले. सर्वांचे पायमालीची चाल सुरू केली. कोणासही संतोष नाहीं. मीर अलमसुद्धां सर्व खट्टे. तेव्हां सरबुलंदजंग व मीर हैदरमुनसी व अजमखान मिळून नवाबास अर्ज केला. यांत अग्रगण्य मुनसी त्रिवर्ग मिळून नवाबांशीं बोलले कीं, श्रीमंतांशीं कराराप्रमाणें निभावावें, गोविंदराव यासी सफाई ठेवावी, तेही दौलतखाहींत अंतर करणार नाहींत, त्यास बोलावूं पाठवावें, आणि त्याशीं एकांतीं बोलावें. त्याजवरून नवाबानीं चोबदार पाठविला कीं, तुह्मीं रात्रीं दरबारास यावें. त्याजवरून गेलों, दिवाणखान्यांत बसलों, तों सरबुलंदजंग व अजमखान व मुनसी त्रिवर्ग येऊन बोलूं लागले कीं, आह्मीं हजरतीशीं बोलून तुह्मांस बोलावूं पाठविलें. तेवेळेस सदरहू, मजकूर इतिकर्तव्यता त्रिवर्गाचीच, असें माझे समजण्यांत आलें. तोंपर्यंत हें वर्तमान समजलें नव्हतें. त्रिवर्ग बोलूं लागले कीं, तुह्मीं दौलतस्वाही करून दाखवाल असें आह्मी हजरतीजवळ बोलिलों, त्यांस शिंदे यास नवाबानीं पैका दिला, त्यांचे तमसुक आहेत तो ऐवज व जप्ती तालुक्याची झाली त्याचा वसूल करारी ऐवजांत वजा घालावा हें तुह्मीं कबूल करावें. याचें उत्तर त्यांस दिलें कीं, मी खाविंद त्या दौलतीचा नाहीं कीं आपला जिम्मा कबूल करावा, जिम्मा कबूल केला आणि खाविंदांनीं मान्य केलें. नाहीं तर शब्द आपल्याकडे घ्यावा कीं काय ? नवाब सांगतात त्याअर्थी याविषयीं रदबदल करून जें होईल तें करीन, यांत कसूर करणार नाहीं. याप्रमाणें बोलिलों. नंतर मुनसी एक वेळ नवाबाकडे गेले. मागती आले. उपरांत ते त्रिवर्ग आणि मी असे नवाबाकडे गेलों. सलाम झाला. त्रिवर्ग मशीं बोलत होते. त्यांतील भाव असा समजण्यांत आला जे, मजकडून पैगाम आहे असें यांनीं नवाबास समजाविलें, पैगाम तर माझा नाहीं, याचें कसें करावें, प्रसंग तर रुबरूचा आला. या मननांतच होतों. नवाबाजवळ जाऊन बसलों. कांहीं वेळ सर्व स्तब्ध बसले. मी नवाबाचे बोलण्याची प्रतीक्षा करितों. नवाब माझे बोलण्याची प्रतीक्षा करतात. मी बोलूं लागलों तर मजकडील पैगाम दिसतो. मुनसी ह्मणूं लागले कीं, बोलावें. ते समयीं मीं नवाबास प्रश्न असा केला जे, चोबदार बोलावूं आला होता, त्याजवरून हजर झालों, काय आज्ञा करणें ती करावी.