Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[७७] श्री. २३ जुलै १७९५.
विज्ञापना ऐशीजे.
प्रस्तुत काळीं येथें बचबच झाली आहे. कांहीं ताळ राहिला नाहीं. दौलतीचे बेहबुदीविषयीं कोणाचें लक्ष नाहीं. आपल्या आपल्यांतच कलवंडतात. नवाबाचे येथील कारभार आपणच करावा असें सर्वांचे मनांत येतें. सामर्थ्य तर कोणाचेंही नाहीं. सर्व दौलतीचे कारभाराचें ओझें आपले डोईवर घेऊन श्रीमंतांकडील देण्याचा जिम्मा आपण घ्यावा, नवाबास उपद्रव किमपि न द्यावा, असें जो करील ते कारभारी होईल. या प्रकारचें सामर्थ्य तर कोणाचें नाहीं. श्रीमंतांनीं अंगीकार केल्यास कोणी करतील. परंतु प्रस्तुत काळीं नवाबास कोणाचा विश्वास येत नाहीं. नवाबाचें अंतःकरण संशयीं असल्यामुळें कोणास धीर पुरत नाहीं. छिद्र पाहणार, नवाबास संशय घालणार लागून राहिले आहेत. त्याजमुळें नवाबाची चित्तवृत्ति स्थिर नाहीं. खासे नवाबानीं मनावर घेऊन करीन ह्मटल्यास अगाध नाहीं. परंतु पैक्याचा लोभ सुटत नाहीं. खजान्यांतून पैका मुबादल्यास द्यावा, ऐशी ह्मणावयाची ताकत कोणाची होत नाहीं. कदाचित् कोणी बोलेन असें ह्मणावें तर जो असें बोलेल तो शत्रुवत् वाटतो. तेव्हां कोणास गरज? खाशानींच आपले मनांत विचार दुरंदेशीचा करून खजान्यांतून पैका द्यावा ; तर ही गोष्ट घडावयाचीच नाहीं. तालुके वगैरे खटपट करून कांहीं ऐवजाची तोड करावी; तर घरचा फंद उभा राहिला. याचे बंदोबस्ताकरितां नवनिगादास्त शिबंदी ठेवणें व मागील शिबंदीचें देणें प्रसंग पाहून लोक अडवितात. त्याची समजूत काढावी लागती. तिकडे पैका खर्च होऊन ही पुरी पडत नाहीं. तेव्हां श्रीमंतांकडील फडच्या कसा होतो ? श्रीमंतांस राजी राखावें तर फौजेस काय द्यावें ? या प्रकारच्या अडचणी आहेत. एका लोभामुळें इतक्या अडचणी पडल्या आहेत. इतकी बचबच कारण उभयतां विप्र आणि मीर अलम त्यांतही रघोत्तमराव मसलत देणार! त्यांचे मसलहतीनें दफ्तरदार नवाबाशीं बोलणार! श्रीमंत व मदारुलमहाम यांनीं करार केला असतां, बदले गोविंदराव कृष्ण यानीं तर नवाबाचें हितशत्रुत्व करून श्रीमंतांचें घर भरलें, असें नवाबास समजावून मर्जी बहारम, केली. याजमुळें नवाबाचा रोष मजवर. वास्तविक पाहतां नवाबाचे बोलण्याचे खातरजमेवर मी स्वामीपाशीं . जिम्मा करून घेऊन नवाबाची सुटका केली. तो उपकार एकीकडे राहून ही अदावळ आणिली. मीर अलम याचें ह्मणणें, मी नवाबापाशीं नालिष श्रीमंतांची अथवा तुमची केली नाहीं, नालिष करावी असें श्रींमंतांकडून घडलें नाहीं, तेव्हां कसें मी बोलेन ?