Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[४८] श्री. ८ जुलै १७९५.
विज्ञापना ऐसीजे. अलीज्याहा गेले, फौज जमा करतील, त्यास सरकारचे तालुक्यांतील फौज तिकडे जाऊं देऊं नये, ह्मणून नवाबानीं लिहिलें आहे. आणि पलटणें या कार्याकरिता आणविलीं ऐसा लेख. याचें उत्तर नवाबास यावें जे, ही गोष्टी बहुत आश्चर्याची वाटली? कारण अलीज्याहा बहादूर याजकडून असें घडूं नये असे असतं झालें, याचें कारण काय? हजरत त्यास सर्वप्रकारें बुजुर्ग कोणतेही उणें त्यास आपण केलें नसंतां असे त्याजकडून कां घडलें ?याचा खुलासा त्यांचा घ्यावा, परकीय बाबत नाहीं, केवळ घरची लेंकरूपणा, या प्रकरणास लांबणीखालीं टाकूं नये, दुनयाईत वाईट दिसेल, कोणेहीप्रकारें समजूत काढून समेट करावा, यांत बुजुर्गीस लाजीम तें हजरतीनीं केलें, मुलास समजाविलें, यांत लौकिक वाईट होणार नाहीं, चांगलाच होईल, हीच सलाह दुरुस्त. केवळ घरचे कामाकरितां इंग्रजी जमीयत बोलावणें ठीक नाहीं. एक तर घरांतील बंदोबस्तास पर यातींतील मनुष्य आणून बंदोबस्त करणें लाजीम नाहीं, दुसरी गोष्ट आपल्या घरांतील बंदोबस्त आपल्याच्यानें न झाला ह्मणून इंग्रजी पलटणें आणिलीं, यांत बुंबकी काणि दाबाची कमती, इंग्रज ही पोहोंची ओळखतील, यास्तव इंग्रजी जमीयत न बोलावतां समेट करून घेणें चांगलें, तालुक्यांतील जमीयत न जावी ह्मणून लेख, त्यास नोकर लोक यास ताकीद केल्यानें जप्त राहील, जे नोकर नाहींत बेरोजगार त्याजवर जस कसा राहील? खुसूस तुमचे तालुक्यांतील लोक बेरोजगार बहुत त्याजकडे गेले असें ऐकिण्यांत, याजवरून कियास करावा कीं असे लोकांवर जस कसा राहील? तथापि जेथवर ताकीद करून मनाई करावयाची ती करीतच आहों. याअन्वयें नवाबाचे पत्राचे जाब यांवे. पलटणाविषयीं वगैरे बहुत तपशील नवाबाचे पत्रांत न लिहावा असें असल्यास थोडकेंच दंशरूप लिहून माझे पत्रावर हवाला घालावा. मला जें लिहिणें असेल तें लिहावें. परंतु पत्रें नवाबास वाचून दाखवावयाजोगीं यावीं. उपदेश करावयाचा तितका करावा. त्यांत आलस्य करूं नये यांतच काम आहे. र॥ छ २० जिल्हेज. हे विज्ञापना.