Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[५१] श्री. ८ जुलै १७९५.
विनंति विज्ञापना. साहेब जादे शहरांतून निघून गेल्यापासून, नवाबानीं शहर व हवेलीचा बंदोबस्त ज्याबज्या चौक्या पहारे ठेवून, बहुत लोक मुसारेमू यास पायदळचे जमीयतसुद्धां तोंडावर जाऊन शह देण्याविषयीं ताकीद झाल्या. बमोजी म बमुसामजकूर आपले लोकसुद्धां लिंग पल्लीनजीक जाऊन उतरला. छ १७ जिल्हेज रविवारीं सदाशिव रड्डीकडील कांहीं स्वार पायदळ जमीयत संगारड्डीहून निघून पुढें आली. मुकेरीयाच्या गोण्या व बैल शहरांत येत होते, ते कांहीं हातीं लागले, पाडून नेले. शहरांत सदाशिवरड्डीचे पांच चारशें लोक गुला होऊन आहेत, ह्मणून नवाबास वर्तमान आवई समजल्यावरून शहरचे तमाम दरवाजे बंद करावे ऐशी ताकीद झाली. छ मजकुरीं तीन प्रहर दिवसां दरवाजे बंद झाले. साहुकार व वेपारी बकाल यांचीं दुकानें लागली. जागजागा चौक्या पहारे याचा बंदोबस्त झाला. अस्तमानपर्यंत हीच हुल्लड झाली. हवेलीचेही तीन दरवाजे बंद करून थोरले देवडीचा एक दरवाजा मात्र खुला ठेविला. वाड्यांत मागेकडील बारगीर व तेजसिंग हजारी वैगेरे लोक नेहमीं चौकीस ठेवून रात्रंदिवस हुशारी व सावधगिरीची येहतियात फार राखिली आहे. र॥ छ २० जिल्हेज. हे विज्ञापना.