Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
याविषयी तुह्मांस कोणी बहकाविलें! त्याजवरून ही गोष्ट अमलांत आली, किंवा तुह्मी आपले बुद्धीनें केली ? आपल्या बुद्धीनें केलें असल्यास काय कारण हें समजावें. तुमचा निरोप आला होता कीं, जमीदार मला घेऊन चालला, त्यास हजरतीची भेट व्हावी, त्यास तुह्मीं त्याचे यख्तियारांत अहां किंवा आपले यख्तियारांत हें कळवावें. याअन्वयें अधिक उणें गोडीनें ममतायुक्त सांगून पाठवावें. जरबेनें सांगूं नये. बिचकतील. ह्मणजे काय खुलासा असेल तो समजण्यांत येईल. नंतर याचा विचार करून करणें तें करावें. तेव्हां बोलले, उत्तम आहे, असें करितों, एक पत्र आह्मी त्यास लिहितों, तुह्मीही एक पत्र लिहावें. तेव्हां ह्मटलें, माझें पत्राचें प्रयोजन काय, याचें कारण समजलें नाहीं. तेव्हां फर्माविलें कीं, तुमचा निरोप चोबदारानें अलीज्याहा यास चौकांत आल्यावर सांगितला कीं आह्मी येत नाहीं, तेसमयी अलीज्याहा यास निराशा होऊन बोलला कीं, दगा झाला, त्यास जे त्याचे बुद्धीस भ्रंश करणार त्यांनी राव पंतप्रधानाकडील भरंवसा त्यास दाखविला असेल, त्याजवरून तुह्माकडे चोपदार बोलावणें पाठविलें, तुमचा निरोप साफ येत नाहीं ह्मणून आला, तेव्हां त्यास असें वाटलें कीं समजावणारांनीं लटकें समजाविलें, याजकरितां तुह्मी पत्र पाठवावें ऐसें तुह्मांस सांगतों यांतील हेंच कारण कीं तुमचें पत्र त्यास निषेधाचें गेलें ह्मणजे त्यास असें वाटेल कीं पंतप्रधानाकडील मातबर त्याचें लिहिणें याप्रकारचें, तेव्हां पंतप्रधानाचा आश्रय नाहीं, ऐसें मनांत खचित येऊन वास्तव्य असेल तें कळवील. याचें उत्तर नबावास दिलें कीं, उत्तम आहे, मसविदा करून द्यावा, आज्ञा होईल तसें लिहीन. तुह्मींच मसाविदा ठरावून द्यावा, आतांच येथे लिहावा असें सांगितलें. बोललों कीं, राजेरेणूरावजी यास आज्ञा व्हावी, ह्मणजे हे मसविदा ठरावून मजकडे पाठवितील, त्यांत अधिक उणें करवयाचें असल्यास मी सांगेन, तें हजरतीनीं पहावें. उत्तम ह्मणून बोलले. नंतर मीरअल्लम वगैरेस बोलाविलें. मला पानदान देऊन रुकसत केलें. मी घरास आलों. दुसरे दिवशीं राजाजीकडून कोणी येईल ह्मणून प्रतीक्षा केली. कोणी आलें नाहीं. तिसरे दिवशीं रघोत्तमराव आले. त्यांनीं सांगितलें, मसविदा कसा ठराविला तो पहावयासि आणविला. त्यास सांगितलें आह्मीं ठराविला नाहीं, तुह्मींच ठरवावा. त्याजकडूनच मसविदा ठरविला. त्यांत हाच मजकूर कीं, हजरतीची कृपा तुह्मांवर विशेष, तुमची निष्ठा हजरतीचे कदमांपाशी एकनिष्ठ, असें असतां हें कोणाचे. सल्लाहानें झालें? किंवा खुद्द यख्तियारानें? मनांतील इरादा काय आहे तो समजावा, ह्मणजे हजरतीस अर्ज करून इरषाद होईल तसें लिहिण्यांत येईल, अन्यायावर दृष्टि देंऊन ज्यांत परिणाम चांगला त्याची पर्याप्त करून उत्तर पाठवावें. यांप्रमाणें रघोत्तमराव यांनींच आपले हातानें मसविदा लिहिला. नवाबास दाखवून आणावा, ह्मणजे पत्र लिहून देऊं, असें सांगितलें. मशारनिल्हे मसविदा घेऊन गेले. चार दिवस झाले. पुन्हा आले नाहींत. ऐकिण्यांत असें आलें कीं, रघोत्तमराव नवाबास बोलले कीं याजकडून पत्र को लिहावे, दुसरे दौलतीतील मनुष्यास आपले घरचे कामांत का आणावें ? हजरतीनींच कोणास अलीज्याकडे पाठवावें, पर्यास करावें, नंतर करणें तसें करावें. याजकरितां आमचें पत्र पाठविण्याचा प्रकार राहिला असें वाटतें. उगीच तंट्यांत शिरणें कशास पाहिजे? त्यांनीं ह्मटलें होतें. त्यांजकडूनच राहिलें. बरें झालें. र।।छ २० जिल्हेज. हे विज्ञापना.