Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[४४] श्री. ३ जुलै १७९५.
विनंति विज्ञापना. साहेबजादे सदाशिवरड्डी याची जमीयत दहा बारा हजार शिवाय निगादास्त ज्यारी. त्याजवर येथून सरदार जमीयत रवाना करावी. याची मसलत नवाब करीत आहेत. जमीयत येतांच बहुतकरून असदअल्लीखान वगैरे भरणेवाईक यांची बरतरफी करविली. हल्लीं काम रुबकर झालें. येथें जमीयत तूर्त थोडी, सबब नवनिगादास्तीचा हुकूम सरदारांस झाला आहे. जोधसिंग खदारकर यांस दोन हजार स्वार ठेवण्याचें सांगितलें. नडसी, सेवाळें, नांदापूर हे तीन महाल नफरदौलाकडील त्यास नेमिलें. मनमोहनराव पिंगळे यांस हजार स्वार ठेवण्याची ताकीद झाली. रुद्रुर पहिले जहागीर त्याजकडे होती, ते हल्लीं बहाल झाली. याप्रमाणें कित्येकांस स्वार पायदळ ठेवण्याविषयीं सांगितलें. येथून लोक जमा करण्याचा उद्योग आहे. पागाही लवकरच आणावी, हे ताकीद पागवाले यास झाली. मुसारहेमू व सुभानखान रोशनखानाचा भाऊ वगैरे सरदार लहानमोठ्यांस रवाना करावयाची नेमणूक होत आहे. मुसारहेमूचें ह्मणणें कीं, तूर्त दोन लाख रुपये दिल्यास निघणें होईल. त्यावरून लाख रुपये त्रिमलराव सुरापूरकर याजकडून त्यास देवविले आहेत. तनखाचिठ्ठी दिली. ऐवज हातास आल्यानंतर लोकांस खर्चास देऊन मुसारेमूचें निघणें होईल. लोकांचे दरमहाचा शेरा स्वारास मराठे यांस वीस, रजपूत पंचवीस, मुसलमान तीस, याप्रमाणें. यांतच कसूर व दसरोजा, वीसरोजा. याजवर लोक जमा होत नाहींत. लोकांचें ह्मणणें या दरमहावर घोडेस्वारांचें पोट भरणें कठीण, तेव्हां चाकरी कशी होती. याप्रमाणें वास्तव्य आहे. मागील नौकरीवर लोक येथें आहेत. त्यांचे आठ आठ महिने बाक्या तटल्या आहेत. त्याची तोड प्रस्तुत ज्याचे आठ महिने देणें त्यास दोनमाही ऐवज द्यावा, चार महिने बाकी त्यास एक महिना. या अन्वयें हिस्सेरसी देण्याचा डौल ठरला आहे. बाजेलोक. जमा होणें सुस्तीचा प्रकार दिसतो. ईश्वइरच्छेवर आहे. लोक कबूल करीत नाहींत. र॥ छ १५ जिल्हेज. हे विज्ञापना.