Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[११५]                                                                               श्री.                                                                 १२ आगष्ट १७९५.                                  
विनंति विज्ञापना. हैदराबाद शहराचा नवाबानीं हवेलीचा बंदोवस्त दरवाजावर परवानगीरसानगी चौक्यापाहरे व रात्रीं गस्त याप्रमाणें नित्यक्रम चालिला आहे. सदाशिवरड्डी जमियतसुद्धां शहरावर येणार, याच्या अवथामुळें रात्रंदिवस हुशारी व ताकीद ज्यारी आहे. छ २३ मोहरमीं रात्रीं नवाब तीन प्रहरापर्यंत दरबार करून मीरअलम व राजाची व सरबुलदजंग वगैरेसुद्धा विचार होता. तीन प्रहर वाजल्यानंतर पिछले प्रहर रात्रीं बरखास्त होऊन लोक आपले मकानास गेले. वाड्यांत पागेचे बारगीर हत्यारबंद चौकीस नेहमीं असतात. गफुरजंगाचे पुत्र एक रामन्मुलुक व आषजाउलमुलुक व मुनिरुलमुलुक या त्रिवर्गास हुकूम रात्रीं चौक्या पाह-यांचा बंदोबस्त शहरचे निगेहबानीविषयीं व देखरेख करीत जावी याप्रमाणें जाला. समशेरजंगास गस्त पाहरा व नवें कोणी मनुष्य आलें गेलें शहरांतील याची चौकशी करून समयाचे समयास अर्ज करावा ऐसी ताकीद झाली. याचप्रमाणें कोतवाल वगैरे सर्वांस खबरदार राहणें ह्मणून ताकीद व येहतीयात सांप्रत फारच आहे. शहराबाहेर कारवानची वस्ती, तेथें साहुकार लोक यांस दम पुरेना, सबब त्यांनीं अगोदरच वस्तवांनी नगदी ऐवज व मुलेंमाणसें गोलकुंड्याचे किल्ल्यांत ठेविलीं. सडे जरारी होते तेही कित्येक किल्ल्यांतच जाऊन राहिले. कारवानची वस्ती उठली. शहरातीलही लोक हवालदील आहेत. चौकशी पाहरे बंदोबस्तही आहे. इतक्यावर जें होईल त्याची विनंती लिहिण्यांत येईल. र।। छ २६ मोहरम. विज्ञापना.