Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[४५] श्री. ३ जुलै १७९५.
विज्ञापना ऐशीजे. नवाबानीं छ १३ तारिखेस बोलाविलें. रात्रौ गेलों. इदीची नजर करावयाची होती ती केली. नंतर अलीज्याहां, यांचे प्रकर्णी बोलणें झालें. दोन खलिते स्वामीचे नांवाचे दिले.एकांत मजकूर अलीजाहा प्रकरणीं आहे. जे; आपल्या तालुक्यांतील, लोक नोकरीच्या इराद्यानें जातील तर जाऊं नयेत, ताकीद सर्वांस व्हावी. दुसरे पत्रांतील मजकूर, अलीजाहा प्रकरणीं इंग्रजांचीं पलटणें दोन पेशजीं होतीं, त्याप्रमाणें आणविलीं, याविषयीं आणखी कांहीं संशय मनांत येऊं नये ह्मणून दोन खलिते पाठविले आहेत. त्याच मजकुराचीं दोन पत्रें राजश्री नानांचे नांवाचीं, दोन गोविंदराव भगवंत याचे नांवाचीं दिलीं तीं पाठविलीं आहेत. नवाबापाशीं बोलणें झालें त्याचा तपशीलवार मजकूर लिहून उदईक पत्रें रवाना करितों. तीं पाऊन सर्व ध्यानांतं येऊन उपरांत या पत्राचीं उत्तरें यावीं. र॥ छ १५ जिल्हेज. हें विज्ञापना.
छ १४ जिल्हेजीं नवाबांनीं पत्रें दिलीं कीं, अलींजाही रुसून गेलेत, यास तालुक्यांतील फौज सामील होऊं देऊं नये व दोन पलटणें आणविलीं आहेत. याचे इतल्ल्याचा मजकूर येणेंप्रमाणें.
फारशी पत्रं.
दुसरे दफे पत्रें तीन येणेंप्रमाणें. छ १४ रोजीं.
फारशी पत्रें ३.
फारशी पत्रें.
छ २० जिल्हेज.
मु. भागानगर रवाना टप्यावर.