Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[५२] श्री. ८ जुलै १७९५.
विनंति विज्ञापना. हैदराबाद शहरचे दरवाजे खुले व बंद.
४ खुले दरवाजे ठेविले. तेथें गाडद बार जवान प्यादे ठेवून बंदोबस्त केला ते.
१ नडव्याचा. १ आलियाबाद. -- २ |
१ चंपादरवाजा. १ याकूतपुरा. -- २ |
८ बंद झाले. १ कलदरवाजा. १ हैदरीदरवाजा १ गाजी बंडा. १ फत्तेदरवाजा. ----- ४ |
१ दूधबावडीचा. १ दिल्लीदरवाजा. १ चदरघाटचा. १ तिरपोली दरवाजा. ------ ४ |
१ डबीलपु-याची खिडकी बंद आहे. ----- १३ |
चार दरवाचे खुले बंदोबस्तीनें ठेवून आठ दरवाजे व एक खिडकी बंद करविले. ते चिनून टाकावे ऐशी ताकीद कोतवालास होऊन दरवाजे चिनावयास आरंभ केला. र।। छ २० जिल्हेज. हे विज्ञापना.