Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[४३] श्री. ३ जुलै १७९५.
विनंति विज्ञापना. अलीज्याहबहादूर ज्या जागीं आहेत तेथून कोणी कोणी येथें शहरांत येतात. त्यांचे जबानीं ऐकण्यांत की, अलीज्याहा यांनीं स्वारास शंभर रुपये व बारगीरास, तीस रुपये व पायदळचे जवानास पंधरा याप्रमाणें दरमहा मुकरर केला. याजकरितां लोक येण्याची आमदनी फार. याप्रमाणें वर्तमान आहे. र॥ छ १५ जिल्हेज. हे विज्ञापना.