Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१७५] श्री. २२ सप्टेंबर १७९५.
विज्ञापना ऐसीजे. इंग्रजांशीं हे बोलतात. त्यांजकडून जबाब साफ होतो. तसाच साफ जबाब नबाबास सांगावा तर मर्जी ठीक राहणार नाहीं. याजकरितां मीरअलम नबाबास समजावितात कीं, दोन महिने दम धरावा, फराशीसाची मसलहत त्याजवर भारी आहे. याजउत्तरीं त्यांशीं लौकरच इंग्रज सलूख करणार. या कार्यापासोन ते निर्वेध जाल्यावर हरएकप्रकारें त्यांस वळवून हजरतीचे कार्यावर आणतों. याप्रों। धातुपोषणाच्या गोष्टी सांगून नाद लावून ठेविला आहे. र।। छ ८ र।।वल. हे विज्ञापना.