Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१७४] श्री. २२ सप्टेंबर १७९५.
विज्ञापना ऐसीजे. इंग्रजी पलटणाचा सरदार नवाबाचे भेटीस आला तेदिवशीं किरकपाट्रिकही होता. नबाबानीं बोलतां बोलतां त्याशीं म।।र केला कीं, राव पंतप्रधान यांचा आह्मांस मोठा उपद्रव; व एक वेळ यांस तदारुक चांगले प्रकारें दिल्हा पाहिजे, त्यास तुह्मी दोस्त आमचे असतां आमचा मनोदय सिद्धीस न जावा कीं काय ? याचें उत्तर किरकपाट्रिक यानें लपेटवा दिल्हें कीं, याचा जबाब कंपनीचे आज्ञेशिवाय देतां येत नाहीं. याजवर मीरअलम नवाबाशीं बोलिले जे, मीं हजरतीचे आज्ञेप्रमाणें यांशीं बोलून अर्ज करीन, आतांच हा मजकूर रूबरू छडूं नये. मग नबाब उगेच राहिले. र।। छ ८ र।।वल. हे विज्ञापना.