Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१७७] श्री. २२ सप्टेंबर १७९५.
विनंति विज्ञापना--इसामिया बेदराकडून लष्करांतून येथें छ ६ रोजीं आला. एक वर्तमान ऐकण्यांत कीं अलीजाह यांजकडील गालबजंग वगैरे सरदार जमीयत सर्व एकत्र होऊन शनवारीं लढाई मुसारेमू वगैरे यांशीं जाली. मुसामा। कोस आर्ध कोस हटले. यास्तव इसामियां हजूर अर्ज करावयास आले ऐसें वर्तमान. परंतु खचीत नाहीं. तहकीक समजल्यावर विनंति लिहिण्यांत येईल. दुसरें, मुसारेमू व पागावाले हे सरदार नबाबाकडील यांत कोणांतकोणी मिळत नाहीं. वतन चित्तापासोन देत नाहींत. इत्यादि त्यांचे गिल्ले सांगावयास इसामिया आले. ऐशी वार्ता आहे. छ ७ रोजीं दिवसा दरबार झाला. इसामियाशीं खिलबत जालें. फरासखान्याचे दारोग्यास हुकूम जाला जे, गोलकुंड्यांतून खेम वगैरे फरासखाना काढून डेरे द्यावे. नबाब निघणार. छ १४ तारखेस डेरे दाखल व्हावे, अशी बोलवा आहे. मागाहून ठरेल त्याप्रमाणें विनंति लिहिण्यांत येईल. र।। छ ८ रा।।वल. हे विज्ञापना.